04 August 2020

News Flash

मी पाच जानेवारीला मंत्रिपदाची शपथ घेणार – महादेव जानकर

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळणार असून, ५ जानेवारी रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा रासपचे महादेव जानकर यांनी लातूर येथे केला.

| December 29, 2014 05:11 am

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळणार असून, ५ जानेवारी रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा रासपचे महादेव जानकर यांनी लातूर येथे केला.
रविवारी बसव महामेळाव्यात ते बोलत होते. मला खाते कोणते मिळेल हे अद्याप ठरलेले नाही, मात्र मंत्रिपदाची शपथ ५ तारखेला घेईन व मंत्री झाल्यानंतर बसव संशोधन केंद्रासाठी आपण निधी देणार असल्याचे त्यांनी सांगून टाकले. पंतप्रधानांच्या कानात बोलण्याची उंची आपण गाठली असल्याचा दावा करून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याविषयी मी त्यांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. मंत्री होण्यापूर्वीच कामे रेंगाळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवेन, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2014 5:11 am

Web Title: i will take oath as a minister on 5 january says mahadev jankar
टॅग Mahadev Jankar
Next Stories
1 समाजकल्याणच्या संकेतस्थळाची ‘उघडझाप’; विद्यार्थी त्रस्त
2 उपचार न मिळाल्याने तान्हुल्याचा मृत्यू
3 ‘मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने विधाने करावीत’
Just Now!
X