News Flash

‘निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिल्यानंतरच बोलेन’

निवडणुकीतील सद्यस्थिती व निवडणूक धोरणाविषयी आपण वक्तव्य केले. निवडणूक आयोगाच्या विरोधात नाही. तरीही आयोगाकडून आपल्याला नोटीस मिळाली असून नोटिशीला उत्तर दिल्यानंतर आपण बोलू, असे सांगून

| July 2, 2013 02:08 am

निवडणुकीतील सद्यस्थिती व निवडणूक धोरणाविषयी आपण वक्तव्य केले. निवडणूक आयोगाच्या विरोधात नाही. तरीही आयोगाकडून आपल्याला नोटीस मिळाली असून नोटिशीला उत्तर दिल्यानंतर आपण बोलू, असे सांगून भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी या विषयावर आपले मौन कायम ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आपण टीका केली नव्हती. त्यामुळे आमदार अमरसिंह पंडित यांनी या वादात पडण्याची गरज नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
मुंडे सोमवारी एका कार्यक्रमानिमित्त बीड येथे आले होते. या वेळी ‘लोकसत्ता’शी बोलताना, सार्वत्रिक निवडणुकांमधील सद्यस्थिती, भविष्यात उद्भवणारी स्थिती व निवडणूक धोरणाविषयी आपण भूमिका मांडली. निवडणूक आयोगाच्या विरोधात कोणतेही वक्तव्य केले नाही, तरीही आयोगाची आपल्याला नोटीस मिळाली. येत्या ७ जुलला आपण त्यास उत्तर देणार आहोत. त्यामुळे या विषयावर आपण अधिक काही बोलणार नाही.
आठ कोटी खर्चाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष्य केल्यासंदर्भात मुंडे म्हणाले की, आपण निवडणूक धोरणाविषयी बोललो. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली नाही. असे असताना पंडित यांनी या वादात पडण्याची गरज नव्हती. २५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत आपण जिल्हयातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित, बाबूराव आडसकर, सुंदरराव सोळंके यांच्याविरुध्द कधीही अपशब्द वापरला नाही. मात्र, अमरसिंह पंडित असे का बोलले? हे कळत नाही. माझे वय जनतेला माहीत आहे. पंडितांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले याची आपल्याला कल्पना नव्हती. ज्येष्ठांबद्दल आपल्याला आदर आहे. पण पंडित बोलले हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. पंडित त्यांच्या वक्तव्यावर ठाम असले, तरी आपण त्यांना माफ केले असल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलन करू नये, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:08 am

Web Title: i will talk after reply given to election commission gopinath munde
Next Stories
1 सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना अटक
2 ‘कॉंग्रेसविरोधी भावनेच्या आधारावर राज्यातील आघाडी सरकार उलथवू’
3 तीनशे आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळांच्या प्रतीक्षेत
Just Now!
X