03 June 2020

News Flash

नगरमधील करोना प्रयोगशाळेला ‘आयसीएमआर’ची मान्यता

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेने यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता.

संग्रहित छायाचित्र

शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या सुसज्ज अशा ‘कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळे’ला (कोरोना टेस्टलॅब) नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर-भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) अधिकृत मान्यता दिली आहे. नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे निदेशक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर जनरल (डॉ.) विभा दत्ता यांनी यासंदर्भात पत्राद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना पत्राद्वारे कळवले आहे.

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेने यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. काल, गुरुवारी या प्रयोगशाळेचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, डॉ. मुरंबीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक बाबी आणि आवश्यक मानके पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाही केली. प्रयोगशाळेची केवळ २० दिवसांत उभारणी केल्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यंत्री प्रसाद तनपुरे यांनी कौतुक केले आहे.

उभारणी पूर्ण झाल्यानंतर चाचणी स्वरु पात औरंगाबाद येथील एका रु ग्णाचा घशातील स्त्राव तपासणीसाठी काल, गुरुवारी या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला. त्यानंतर त्याचे पृथ:करण करुन तो अहवाल नागपूरच्या आयुर्विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आला. तत्पूर्वी प्रयोगशाळेत पायाभूत सुविधा दिलेल्या निर्देशांप्रमाणे निर्माण केल्याची खात्री संस्थेकडून करण्यात आली. स्राव अहवालाचे परीक्षण करण्यात आले. तो बरोबर आल्यानंतर तसा अहवाल ‘आयसीएमआर’कडे पाठवण्यात आला. आयसीएमआरने सर्व निकष पूर्ण करीत असल्याचे स्पष्ट करीत या प्रयोगशाळेला चाचणीसाठी अधिकृत मान्यता देत असल्याचे सांगितले.

दिवसाला तीनशे चाचण्या

या मान्यतेमुळे आता जिल्ह्यातील कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तींची चाचणी येथेच करणे शक्य झाले आहे. एका पाळीत १०० असे तीन पाळीत ३०० चाचण्या एका दिवसात घेणे शक्य होणार आहे. सुरु वातीच्या टप्प्यात दोन पाळीत काम केले जाणार असून दिवसाला २०० चाचण्या अपेक्षित आहेत. जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील रुग्णांच्या करोनासंदर्भातील चाचण्या सुरु वातीला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे नंतर लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात केल्या जात आहेत. आता चाचण्या येथेच करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:51 am

Web Title: icmr accreditation to corona laboratory in the city abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपचे काळे झेंडे
2 बीड जिल्हा रुग्णालयात करोना संशयित युवकाचा मृत्यू
3 जालना जिल्ह्य़ात करोनाचे ५२ रुग्ण ; आणखी सातजण आढळले
Just Now!
X