News Flash

ICSE बोर्डाची दहावीची परीक्षा जुलै महिन्यात, कोर्टाला दिली माहिती

महाराष्ट्र सरकारने याबाबत कोर्टात घेतला आक्षेप

संग्रहित छायाचित्र

मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. भुगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला. आता ICSE बोर्डाने दहावीची परीक्षा जुलै महिन्यात घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबतची माहिती त्यांनी मुंबई हायकोर्टाला दिली. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुरक्षेचे सगळे निकष आणि नियम पाळून आम्ही परीक्षा घेण्यास सज्ज आहोत असं ICSE बोर्डाने कोर्टाला सांगितलं आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र या गोष्टीला आक्षेप घेतला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जुलै महिन्यात परीक्षा घेणे योग्य नाही असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होईल.

आणखी वाचा- गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने केले ऑनलाईन शैक्षणिक ऑडिट

महाराष्ट्रात करोनाची स्थिती गंभीर असल्याने आयसीएससी बोर्डाने प्रलंबित परीक्षा घेणं योग्य नाही असं कुंभकोणी यांनी कोर्टात सांगितलं. मात्र ICSE बोर्डाने कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे की परीक्षा आयोजित करण्यासाठी बोर्डाला राज्य सरकारच्या संमतीची गरज नाही. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एस एस. शिंदे यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. अरविंद तिवारी या याचिकाकर्त्याने ICSE बोर्डाच्या महाराष्ट्रात परीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. दरम्यान बोर्डातर्फे राज्यात २ ते १२ जुलै या कालावधीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा २७ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२० या कालावधीत होणार होती. मात्र १९ मार्चनंतरची परीक्षा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने स्थगित करण्यात आल्या. आता या परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जातील असं ICSE बोर्डाने कोर्टाला सांगितलं आहे. एका इंग्रजी वेबसाइटने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 2:09 pm

Web Title: icse 10th exams in%e2%80%89maharashtra to be conducted in july scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना चाचणी : राज्य सरकारचा खासगी लॅबला दणका, तर सामान्यांना दिलासा
2 ‘फेकुताई’ म्हटल्याने नगरसेविकाला राग अनावर, तरुणासह कुटुंबावर सशस्त्र हल्ला
3 ‘नासाचे शास्त्रज्ञ’ प्रणित पाटील येत आहेत ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर
Just Now!
X