05 June 2020

News Flash

Coronavirus : शेतमजूर महिलांनी ठेवला शहरी सुशिक्षितांपुढे आदर्श

शेतातील काम करतानाही केले जात आहे सर्व नियमांचे पालन

शेतात काम करणाऱ्या शेतमजूर महिलांनी सुरक्षित अंतर ठेवण्याचे बंधन पाळून शहरातील दुकानांपूढे झुंबड घालणाऱ्या सुशिक्षितांपूढे एक आदर्श घालून दिल्याचे चित्र वर्धामध्ये समोर आले आहे.   खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी शेतीपूरक काम करण्यासाठी ठराविक नियम पाळून मूभा दिली होती. त्यानंतर बुधवारी कृषी सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी दिल्याने ग्रामीण भागात रोजगार सुरू झाल्याने कष्टकऱ्यांना दिलासा मिळाला.

वर्धेलगत पवनूर येथे प्रा. मोहन सोनूरकर यांची शेती आहे. उन्हाळी तीळ लावल्यानंतर काही दिवसातच संचारबंदी सुरू झाली. परिणामी, सर्व व्यवहार ठप्प झाल्याने शेतातील कामेही खोळंबली याचबरोबर  मजुरांवर रोजंदारीच्या चिंतेचे सावट पसरले होते. पण आता प्रशासनाकडून थोडयाफार प्रमाणात मूभा मिळाल्याने सोनूरकर यांच्या शेतातील कामे मार्गी लागली आहेत. शेतीतील तण वाढल्याने निंदनीचे काम होते. त्यासाठी लगतच्याच सुकळी येथील महिलांना निरोप मिळाला.  संचारबंदीमुळे कित्येक दिवस हाताला काम नसल्याने 10 ऐवजी 30 महिला आल्या दहा दिवसांचे काम तीन दिवसात संपले या खात्रीने सर्वानाच काम देण्याची भूमिका सोनूरकर यांनी  घेतली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर या महिलांना  सर्व त्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या महिला  काम करतांना आपसात एक मीटरचे अंतर ठेवत आहेत.  विशेष  म्हणजे न्याहारीची वेळ झाल्यावर झाडाखाली बसतांना देखील त्या  ठराविक अंतर राखत आहेत. मास्क नसल्याने चेहऱ्याला कापड गुंडाळण्याची काळजी सुध्दा घेतली जात आहे. परिसरात सध्या याच शेतात काम असल्याने येथील महिलांचे उदाहरण सर्वांसाठी बोलके ठरले आहे. गावात शिधापत्रिकेचे धान्य मिळाले. तर, शिधापत्रिका नसणाऱ्यांना मोफत धान्य मिळणार होते. मात्र ते अद्याप मिळाले नसल्याची महिलांची तक्रार आहे. मजूरी मिळाल्याने या संचारबंदीच्या दिवसात शेतमालक देवदुतासारखे ठरल्याचे त्या सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 1:02 pm

Web Title: ideal laid by farm laborers for educated people msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मंत्र्यांच्या प्रश्नावर किरीट सोमय्या म्हणतात ‘अब मेरे सवालों का जबाब दो!’
2 महाराष्ट्र – गुजरात सीमेवर खलाशांमध्ये पुन्हा तणाव
3 थाळ्या-टाळ्या वाजवणे महत्त्वाचेच होते… देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण
Just Now!
X