18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

आमदार आदर्श ग्राम योजनेचा बोजवारा

 काय आहे आदर्श ग्राम योजना ?   

हर्षद कशाळकर, अलिबाग | Updated: August 13, 2017 12:48 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

केंद्राच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यातही आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याची घोषणा राज्यसरकारने केली होती. मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत आमदारच उदासिन असल्याचे दिसून आहे. रायगड जिल्ह्य़ातील १० आमदारांपकी ५ जणांनी आदर्श ग्राम योजनेसाठी गावांची निवड केले नाही. आणि ज्या आमदारांनी गावांची निवड केली आहे त्यात एकही काम सुरु झालेले नाही. त्यामुळे ही योजना पुरती फसली आहे. राज्यसरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश २० मे २०१ प्रसिद्ध करण्यात आला. प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील एका गावांची निवड करून ती नावे राज्य सरकारकडे पाठवणे आवश्यक होते. यासाठी गेल्यावर्षी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र रायगड जिल्ह्य़ातील विधानसभेच्या सात व विधान परिषदेच्या तीन अशा एकूण १० आमदारांपकी ५ जणांनी या योजनेसाठी आपल्या मतदारसंघातील गावांची नावे अद्याप कळवलेली नाहीत. अध्यादेश काढून जवळपास २ वर्षे उलटले असले तरी जिल्ह्य़ात या योजनेबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे आमदार या योजनेबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहे.

योजनेसाठी निवडण्यात आलेली गावे जुल २०१९ पर्यंत आदर्श ग्राम म्हणून विकसित केली जाणार आहेत. मात्र या गावांची निवड करताना आमदारांना आपले स्वतचे व आपल्या पत्नीच्या माहेरचे गाव या योजनेसाठी निवडण्यास र्निबध घालण्यात आले आहेत. याशिवाय निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या किमान एक हजार असणे अपेक्षित आहे. मुंबईसारख्या शहरी भागातील आमदारांना शेजारच्या जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील गावांची निवड करता येणार आहे. तर विधानपरिषदेचे सदस्य त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही जिल्ह्य़ातून गावांची निवड करू शकणार आहेत.   \ रायगड जिल्ह्य़ात एकुण १० आमदार आहेत. यातील सुभाष पाटील (अलिबाग), धर्यशील पाटील (पेण) , मनोहर भोईर (उरण), प्रशांत ठाकूर (पनवेल), सुरेश लाड (कर्जत) या विधानसभा सदस्यांनी गावांची निवड केली आहे. तर भरत गोगावले (महाड), अवधूत तटकरे (श्रीवर्धन) या विधानसभा सदस्यांसह सुनील तटकरे, अनिल तटकरे व जयंत पाटील या विधान परिषद सदस्यांनी गावांची निवड केलेली नाही. ज्या पाच आमदारांनी गावांची निवड केली आहे. त्यात फारशी कामे झालेली नाहीत. त्यामुळे या योजनेचा उद्देशच फसला असल्याचे दिसून येत आहे. आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी विशेष निधीची तरतुद नसल्यानेही उदासिनता आहे. एकुण सांसद आदर्श ग्राम योजेनेपाठोपाठ आमदार आदर्श ग्राम योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान याबाबत विचारणा केली असता मतदारसंघातील एका गावाची निवड केल्यास दुसऱ्या गावातील लोक नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावांची निवड करताना अडचणी येत असल्याचे आमदार सांगतात.

 काय आहे आदर्श ग्राम योजना ?   

या योजने अंतर्गत निवड झालेल्या गावाचा सामाजिक आíथक, शैक्षणिक स्तर उंचावणे, आरोग्य स्तर उंचावणे, कुपोषण, गुन्हेगारी आणि बेकारी कमी करणे, ग्रामविकासात लोकसहभाग वाढवणे, शेती, ग्रामउद्योग आणि बँकींगला चालना देणे  सुसज्ज ग्रामपंचायत भवन, उत्तम दर्जाचे रस्ते, पुर्णवेळ वीज, अन्य सार्वजनिक सेवा – सुविधा, इंटरनेट सुविधा विकसित करणे. नसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करणे. घनकचऱ्याची व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रि या यांसारखे उपक्रम राबविणे अपेक्षित आहे.

आमदारांनी निवडलेली गाव

  • सुभाष पाटील- धोकवडे (अलिबाग)
  • धर्यशील पाटील- महागाव (सुधागड)
  • प्रशांत ठाकुर- तुभ्रे (पनवेल)
  • मनोहर भोईर- वावल्रे (खालापुर)
  • सुरेश लाड- उंबरे (खालापुर)

 

First Published on August 13, 2017 12:48 am

Web Title: ideal village scheme in alibag