News Flash

रायगड जिल्हय़ात पुन्हा बेवारस मृतदेह आढळला

रोहा तांबडी मार्गावरील हनुमान टेकडीपासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात हा मृतदेह आढळून आला.

शिना बोरा हत्या करून तिचा मृतदेह रायगड जिल्हय़ातील गागोदे येथे आणून जाळल्याचे प्रकरण गाजत असतानाच आता रोहा तालुक्यातील तांबडी गावाजवळ एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात भादवी ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
रोहा तांबडी मार्गावरील हनुमान टेकडीपासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात हा मृतदेह आढळून आला. अर्धवट जळलेल्या स्थितीत आढळलेल्या या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार या व्यक्तीचा खून करण्यात आला असून, त्यानंतर त्याच्या मृतदेहाला या जंगलात आणण्यात आला असावा. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून ज्वलनशील पदार्थ आणि रबरी टायरच्या साहय़ाने त्याला जाळण्यात आले असावे असा संशय व्यक्त केला जातो आहे.
सदर मृतदेह महिलाचा आहे की पुरुषाचा याचा खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र शिना बोरा प्रकरणात रायगड पोलिसांवर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन या वेळी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. या प्रकरणी रोहा पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून मृतदेहाचे अवशेष तपासणीसाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायगड जिल्हय़ात बेवारस मृतदेह आढळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या १५ वर्षांत रायगड पोलीस विभागाच्या हद्दीत तब्बल ९७८ बेवारस मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील २४ प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यात खोपोली परिसरात सर्वाधिक १०८, रोहा येथे १३७, पेण येथे ९८, खालापूरमध्ये ८१, अलिबाग येथे ७३, माणगाव येथे ८१, महाडमध्ये ४९, पोलादपूर येथे २३ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील केवळ २४ प्रकरणांमध्येच पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. उर्वरित ९५० मृतदेहांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यामुळे बेवारस मृतदेहांच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2015 6:02 am

Web Title: identified body found in raigad district
टॅग : Dead Body
Next Stories
1 खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल
2 उत्तर महाराष्ट्रात नगर पंचायत निवडणुकीत ८० टक्के मतदान
3 रत्नागिरी नगर परिषद पोटनिवडणुकीत ५० टक्के मतदान
Just Now!
X