29 November 2020

News Flash

“बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं”

भाजपा नेते नारायण राणे यांचं वक्तव्य

आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री केलं नसतं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. कळसूत्री बाहुली ही किमान तालावर तरी नाचते उद्धव ठाकरेंना नाचताही येत नाही. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं असं वक्तव्य भाजपा नेते नारायण राणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे म्हणजे दिशाभूल करणारे, थापा मारणारे मुख्यमंत्री आहेत. मराठ्यांना आरक्षण हा माणूस कधीही देऊ शकत नाही कारण मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस आहे असाही आरोप नारायण राणेंनी केला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या माणसाला कधीही मुख्यमंत्री केलं नसतं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

कळसूत्री बाहुली ही किमान तालावर तरी नाचते उद्धव ठाकरेंना नाचताही येत नाही. मोदींच्या जीवावर निवडणूक लढवली म्हणून ५६ आमदार तरी आले पुढच्या वेळी तेवढेपण येणार नाहीत. दुसऱ्याच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना काहीही करता येत नाही. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. अत्यंत पुळचट आणि शेळपट माणूस आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यापुढे माझ्यावर किंवा माझ्या मुलांवर टीका केली किंवा भाजपावर टीका केली तर तशाच भाषेत उत्तर दिलं जाईल. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे म्हणून मी गप्प बसलो आहे. जर मातोश्रीच्या आत काय काय चालतं ते सांगितलं ना तर कपडे घेऊन पळत फिरावं लागेल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जे भाषण केलं त्यावेळी राणे पितापुत्रांचा उल्लेख बेडुक असा केला होता. बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला असं उल्लेख त्यांनी करत नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार नारायण राणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत घेतला. उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणवतात त्यांनी कधी कुणाला एक कानफटात तरी मारली आहे का? आमच्यासारखे शिवसैनिक होते त्यावेळी म्हणून शिवसेना उभी राहिली. गुन्हे आम्ही अंगावर घेतले या शेळपट माणसाने नाही. वाघ कसला? हा तर शेळपट माणूस.. हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अधिकारीही मुख्यमंत्र्यांना हसतात असाही टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 4:52 pm

Web Title: if balasaheb thackeray was alive today uddhav thackeray would not have been made the chief minister says narayan rane scj 81
Next Stories
1 जनाची नाही, तर मनाची वाटली पाहिजे – नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार
2 उद्धव ठाकरे हे पिंजऱ्यातला वाघ की पिंजऱ्याबाहेरचा?-नारायण राणे
3 करोना चाचणी झाली आणखी स्वस्त, जाणून घ्या नवे दर