News Flash

भाजपाने लोकसभा जिंकल्यास ती देशाची शेवटची निवडणूक: सुशीलकुमार शिंदे

मोदी यांच्यात हुकूमशहा ठासून भरला आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ताधारी हे राक्षस असून त्यांनी जर लोकसभा निवडणूक जिंकली तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल. कारण मोदी यांच्यात हुकूमशहा ठासून भरला आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनोमिलन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच माझे दिल्लीत ‘दुकान’ चालते, असेही कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले.

सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वडाळा येथे पार पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 3:08 pm

Web Title: if bjp wins loksabha election then this election is the last election of india says sushil kumar shinde
Next Stories
1 अमेरिकेत शिवरायांचा जयजयकार
2 युती केल्याने शिवसेना – भाजपाचा फायदा की तोटा?, आकडेवारी काय सांगते…
3 सचिन तेंडुलकरही शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक !
Just Now!
X