News Flash

महाराष्ट्र सरकार तीन चाकी रिक्षा असेल तर NDA ही रेल्वेगाडी: उद्धव ठाकरे

भाजपा आणि एनडीएला उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

महाराष्ट्र सरकारला तीन चाकं आहेत, तीन चाकी रिक्षा असंही विरोधक महाविकास आघाडी सरकारला सुनावत असतात. पण महाराष्ट्र सरकार जर तीन चाकी रिक्षा असेल तर एनडीए अर्थात भाजपा आणि मित्रपक्षांचं सरकार हे रेल्वेगाडी आहे असा टोला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं तीन चाकांचं सरकार आहे असं कायम सांगितलं जातं. ही तीन चाकं एका दिशेने चालत आहेत हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. याच मुलाखतीत रिक्षाबाबतच्या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.

” बुलेट ट्रेन की रिक्षा असा प्रश्न विचारलात तर मी रिक्षाच कारण आपलं सरकार हे गोरगरीब जनतेचं सरकार आहे. त्यामुळे माझा पाठिंबा हा रिक्षेलाच असेल. सत्तेवर आलो तरीही बुलेट ट्रेनचा प्रकल्प मान्य नाही केला. कारण बुलेट ट्रेनची गरज नाही हे जसं महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं तसंच ते मलाही वाटतं. जनतेला काय वाटतं ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. विरोधी पक्ष कायम टीका करतो की हे तीन चाकांचं सरकार आहे. आमचं सरकार तीन चाकांचं असेल तरीही ही तीन चाकं योग्य दिशेने चालली आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मागे एकदा एनडीएच्या बैठकीत गेलो होतो तेव्हा तिथे तर ३० ते ३५ घटक पक्ष होते. शिवाय राज्याराज्यांमध्ये अपक्षांचीही साथ त्यांना आहेच. म्हणजेच आपलं सरकार हे जर तीन चाकी रिक्षा असेल तर एनडीए ही तर रेल्वे गाडी आहे” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मला प्रशासनाचा अनुभव नाही

आघाडीचं सरकार चालवताना मर्यादा असतात असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणायचे तसंच अटलबिहारी वाजपेयीही म्हणायचे. अनेक पक्ष असतात प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या असतात. एकदा त्रागा करुन मनमोहन सिंहदेखील म्हणाले होते की मी काही निर्णय घेऊ शकत नाही आपलीही अवस्था अशीच आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, “मनमोहन सिंह यांना प्रशासनाचा अनुभव होता. त्याच्यामुळे त्यांना मर्यादेचं एक भान होतं. मला प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे मला मर्यादेचं भान नाही.”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 9:25 am

Web Title: if maharashtra government is a three wheeler auto then nda is a train says cm uddhav thackeray scj 81
टॅग : Uddhav Thackeray
Next Stories
1 “…तर मी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करेन”; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा
2 “आज गुंतवणूक नाकारुन उद्या चिनी राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात गळे घालून मिरवणार असाल तर…”
3 “उद्योगधंद्यांबद्दल सरकारी धोरणे योग्य नसतील तर…”; मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा निशाणा 
Just Now!
X