01 March 2021

News Flash

शिंदे हेच गृहमंत्री असतील तर ‘आदर्श’चा तपास कसा होणार?

मुंबईतील आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याच्या चौकशीचाच घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात अडकलेले सुशीलकुमार शिंदे हेच जर केंद्रीय गृहमंत्री असतील

| January 26, 2014 03:59 am

मुंबईतील आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याच्या चौकशीचाच घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात अडकलेले सुशीलकुमार शिंदे हेच जर केंद्रीय गृहमंत्री असतील, तर या घोटाळ्याचा तपास कसा होणार, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी उपस्थित केला.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले,ह्वआदर्श घोटाळ्यात सुशीलकुमार श्िंादे यांच्यासह शिवाजीराव निलंगेकर, अशोक चव्हाण व दिवंगत विलासराव देशमुख यांचा सहभाग उघड झाला असून, त्याबाबतचा ठपका न्या. पाटील आयोगाने ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. हा चौकशी अहवाल नाकारत तसेच संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यास मान्यता देण्यास राज्यपालच नकार देत असतील तर ही जबाबदारी कोणाची, मुख्यमंत्र्यांची की राज्यपालांची, हे स्पष्ट व्हायला हवे.ह्व
आपण या घोटाळ्यासंदर्भात दोषींविरुद्ध कारवाई होण्यासाठी सीबीआय न्यायालयात याचिका दाखल करणाार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 3:59 am

Web Title: if sushilkumar shinde remain home minister how impartial prob of adarsh scam happen somaiya
टॅग : Sushilkumar Shinde
Next Stories
1 नकटय़ा रवळय़ा विहिरीचे वैभव कल्पनेतच उरले
2 देशाच्या विकासासाठी महिला सबलीकरणाचे धोरण आवश्यक
3 भावी पिढी घडवण्याचे काम स्मारकातून व्हावे – शरद पवार
Just Now!
X