News Flash

“महाराष्ट्रात ५ जूननंतर करोनाचा भडका उडाला तर सुपरस्प्रेडर भाजपा जबाबदार असेल!”

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली टीका; देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना मागितलं आहे स्पष्टीकरण

संग्रहीत

“५ जून रोजी सुपरस्प्रेडर भाजपा आंदोलन करत आहे व करोनाच्या संकटात जनतेचा जीव आपल्या स्वार्थी राजकारणासाठी धोक्यात घालत आहे. भाजपाचे बेजबाबदार वर्तन देशात करोनाच्या हाहाकाराला आधीच कारणीभूत ठरले आहे. महाराष्ट्रात ५ तारखेनंतर करोनाचा भडका उडाला तर सुपरस्प्रेडर भाजपा जबाबदार असेल.” अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली.

“मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी ३ गोष्टी स्पष्ट केल्या आहेत”; सचिन सावंत यांनी साधला निशाणा

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपावर निशाणा साधताना सचिन सावंत म्हणाले की, “एके ठिकाणी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचे‌? भाजपानेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी द्यावे.”

“चंद्रकांत पाटलांनी असं म्हणणं मराठा आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारं”

तसेच, “मराठा समाजाने कोल्हापूरला ज्या संस्थेविरोधात आंदोलन केले त्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संस्थेची स्थापना भाजपाच्या इशाऱ्यावर नागपूर येथे २०१९/२० करण्यात आली का? या संस्थेचे विश्वस्त नागपूरचे असून भाजपा आणि संघाशी संबंधित आहेत.” असं देखील सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.

“मराठा आरक्षणासाठी भाजपा सर्वोतोपरी प्रयत्न करणार; आंदोलनात एक नागरिक म्हणून सहभागी होणार”

“कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रविण दरेकरांनी व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपाची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू.” असं सचिन सावंत यांनी काल ट्विटद्वारे म्हटलं होतं.

बीडमध्ये ५ जूनला सरकार विरोधात मोर्चा – मेटे

बीड येथून शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे ५ जून रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “विनायक मेटे ५ तारखेला काढत असलेल्या मोर्चात आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा किंवा बॅच घेऊन सहभागी होणार नाही. पण एक नागरिक म्हणून पक्षातील सर्वजण सहभागी होणार आहोत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 3:03 pm

Web Title: if the corona erupts in maharashtra after june 5 bjp will be responsible for the spreader sachin sawant msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “ज्यांच्यासाठी बाजू मांडताय, त्यांची आता एव्हढी लाज निघालीये ना”
2 राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ही केवळ अफवा, नवाब मलिकांचा खुलासा
3 Maharashtra Lockdown: लॉकडाउनसंबंधी विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले….
Just Now!
X