धुळ्याच्या महापालिका निवडणुकीत अनिल गोटेंची कोणीही दखल घेतली. त्यांच्या नव्या पक्ष्याच्या दोन जागा कशा आल्या याचेच आम्हाला आश्चर्य वाटत आहे. इथले लोकंच गोटेंना साथ द्यायला तयार नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांच नेतृत्व आम्ही स्विकारलं असत तर आम्ही दोन आकड्यातंही गेलो नसतो, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतलेला निर्णय योग्य होता, अशा शब्दांत भाजपा नेते गिरीश महाजन यांनी बंडखोर अनिल गोटेंचा समाचार घेतला.

महाजन म्हणाले, धुळ्यामध्ये आम्ही पन्नासच्यावर जागांवर आघाडीवर असून यावरुन धुळेकरांनी आम्हाला स्पष्ट बहुमत आम्हाला दिलं त्यामुळे त्यांच आभार मानतो. मात्र, या तुलनेत आम्ही नगरमध्ये कमी पडलो. आमची युती नसल्याने त्यामुळे येथे कोणा एकाचे सरकार स्थापन होणे कठीण आहे. त्यासाठी युती ही करावीच लागेल.

धुळ्यात शेवटच्या टप्प्यात आमचा आकडा ५०च्या वर जाईल याची आम्हाला खात्री आहे. धुळेकरांनी इथं भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्याने दहशतीतून धुळेकरांची मुक्तता झाली आहे. गोटेंच बोलंण, सोशल मीडियातील त्यांच भाष्य, घाण भाषेतील लिखान त्याचबरोबर स्वतःवर दगड मारून घेण, रुग्णयालयात अॅडमिट होऊन घेण ही त्यांची नाटकं होती. त्यामुळे धुळ्यात ते आता भुईसपाट झाले आहेत. गोटेंची मनस्थिती ठीक नाही त्यामुळे त्यांनी आता आराम करावा. आम्ही सर्वे केला तेव्हा गोटेंच्या नेतृत्वाखाली काही जमणारच नाही, असं लक्षात आलं त्यामुळेच त्यांना बाजूला करण्याचा निर्णय पक्षाने घेतला.

महाजन म्हणाले, मी जेव्हा मिशनवर जातो तेव्हा पूर्ण तयारीने जातो. मी खोटी विधानं करीत नाही, फालतू बोलत नाही. त्यामुळंच मला यश मिळत आहे. लोकांचा विश्वास सध्या भाजपा, फडणवीस आणि मोदींवर आहे. आता विजय दृष्टीपथात असल्याने आम्ही धुळेकरांना जे जे शब्द दिले आहेत, ते पूर्ण करणार आहोत. त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणार आहोत. ३०० ते ४०० कोटी रुपये धुळ्याच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी आणणार.

राज्यातील ८० टक्के महापालिका भाजपाकडे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला स्विकारायला या राज्यात कोणी तयार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ पैसे वाटतायत आणि मशिन बदलल्या एवढेच आरोप करायचे राहिलेत. अनिल गोटेंनीही कोणाला गुंड म्हणणे हा मोठा विनोदच आहे. १४ ते १५ मुस्लिमंच्या जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे एमआयएमच्या ४ जागांमुळे आम्हाला फटका किंवा फायदा झालेला नाही, असेही यावेळी महाजन यांनी म्हटले आहे.