अवैध गर्भपात प्रकरणानंतर आरोग्य विभागाकडून मोहीम

चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहरातील ६५० हून अधिक रूग्णालयांची झाडाझडती महापालिकेने सुरू केली असून यासाठी आरोग्य विभागाची १० पथके तनात करण्यात  आली असून आरोग्य विभागाला तपासणीचा अहवाल १० दिवसात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमबा आढळल्यास जागेवर हॉस्पिटल सील करण्याचे आदेशही या पथकाला देण्यात आले आहेत.

शहरातील सर्व रुग्णालये, नìसग होम, सीटी स्कॅन, एमआरआय केंद्रे अशा ६५० हून अधिक रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शहरात २९७ खासगी रुग्णालये, परवानाधारक नìसग होम्स, २३८ सर्वोपचार रुग्णालये, बारुग्ण विभाग, नोंदणीकृत रुग्णालये, तर ११० सोनोग्राफी, एमआरआय, सिटी स्कॅन तपासणी केंद्रे आहेत.

या सर्वाना महापालिकेचे परवाने सक्तीचे आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाकडून सर्व त्या उपाययोजनांची वार्षकि तपासणीही करावयाची असते. यासंदर्भात बॉम्बे नìसग कायदा, डब्ल्यूटीपीच्या धर्तीवर एमपीटी कायदा (गर्भपात प्रतिबंधात्मक कायदा), पीसीपीएनडीटी कायदा (लिंगभेद निदान प्रतिबंधात्मक कायदा) अशा कायद्यांतर्गत या सर्व रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचीही जबाबदारी आरोग्य विभागाची आहे.

तपासणीसाठी आरोग्य विभागाची दहा पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये दोन डॉक्टर, दोन नर्स, क्लार्क यांचा समावेश केला आहे.  रुग्णालयांचे सर्व परवाने, सोयी-सुविधा, खाटांची नोंदणी आणि प्रत्यक्ष संख्या, औषधे, इमारत, सफाई, सुरक्षा या सर्व पातळीवर तपासणी हाती घेतली आहे. तपासणीवेळी त्रुटी आढळल्यास जागेवर रुग्णालय सील करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत, प्रसंगी अशा रुग्णालयांवर फौजदारी कारवाईचे संकेतही त्यांनी दिले.