News Flash

हातभट्टीचा अड्डा उध्वस्त करणाऱ्या पोलिसांवर सशस्त्र हल्ला

मारहाण करून हल्लेखोर फरार, जखमी पोलिसांवर उपचार सुरू

-दत्तात्रय भरोदे 

शहापूर तालुक्यातील सरलंबा येथे गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त करण्यासाठी गेलेल्या शहापूर पोलिसांवरच लाठ्याकाठ्यांनी व हत्यारांनी हल्ला करत त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. एवढेच नाहीतर पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली.  जखमी पोलिसांवर शहापुरात उपचार सुरू असून हल्ला करणारे फरार झाले आहेत.

शहापुरातील सरलांबा येथे गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण बळीप, पोलीस हवालदार काशिनाथ सोनवणे, रणजित पालवे, भाऊ बेंडकुळे, अतुल खेडकर व संतोष हुमणे, भाकरे, शेरे व फर्डे हे होमगार्ड असे पथक आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास सरलांबा येथे गेले होते.

येथे सुरू असलेल्या हातभट्टीचे २०० लिटरचे ३० ड्रम पोलिसांनी उध्वस्त करत,  सुमारे तीन लाखाचा माल उध्वस्त केला. यामुळे बेकायदेशीर हातभट्टी चालवणाऱ्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांच्या गाडीची, वायरलेस मशीन, मोबाईल या वस्तूंची तोडफोड केली. तसेच, पोलीस उपनिरीक्षक किरण बळीप, चालक अतुल खेडकर यांना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. संतोष हुमणे या होमगार्डच्या डोक्यावर जीवघेणा हल्ला केला, अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली.

जखमी पोलिसांवर शहापूर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर फरार झाले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 8:38 pm

Web Title: illegal alcohol producer attack on police msr 87
Next Stories
1 विद्युतवाहिनी सर्वेक्षणासाठी ड्रोनच्या सहायाने आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती
2 महाराष्ट्राने पुन्हा करुन दाखवलं, बरे झालेल्या रुग्णांची विक्रमी संख्या; ४१६१ रुग्णांना सोडले घरी
3 चंद्रकांत पाटील यांना मुश्रीफ समर्थकांकडून धन्यवाद, वादावर पडदा!
Just Now!
X