07 April 2020

News Flash

संगमनेरला बेकायदेशीर दारू जप्त

हरयाणातून बेकायदेशीररीत्या आणली जात असलेल्या दारूच्या दोन मालमोटारी गुरुवारी संगमनेरच्या दारूबंदी विभगाच्या पथकाने सापळा लावून पकडल्या.

| July 11, 2014 03:25 am

हरयाणातून बेकायदेशीररीत्या आणली जात असलेल्या दारूच्या दोन मालमोटारी गुरुवारी संगमनेरच्या दारूबंदी विभगाच्या पथकाने सापळा लावून पकडल्या. दोन्ही मोटारी ताब्यात घेण्यात आल्या असून दिवसभर या खोक्यांची मोजदाद चालू होती. या दारूची किंमत कोटीच्या घरात जाण्याची शक्यता असून जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. याशिवाय पकडलेली दारू असली की नकली याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.
आषाढाच्या पार्श्र्वभूमीवर परराज्यातून संगमनेरकडे दारू वाहतूक करणा-या मोटारी येत असल्याची माहिती येथील दारूबंदी खात्याच्या अधिका-यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक एम. बी. चव्हाण संगमनेर तळेगाव रस्त्यावरील तिगाव शिवारात सापळा लावला, आज पहाटे दोन मालमोटारी हॉटेल अर्चना येथे आल्या. पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता गाडीत औषधे असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला.
गाडीची तपासणी केली असता वरती गुटख्याचे पोते, औषधांचे खोके आणि त्याखाली दडवून ठेवलेले दारूचे खोके सापडले. त्यामुळे दोन्ही मालमोटारीतील केदारसिंग सिसोदिया, हकीमखान इब्राहिम खान, आबिदखान अशा तिघांना ताब्यात घेतले. दारूबंदी खात्याच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, दुय्यम निरीक्षक धोत्रे, बी. टी. व्यवहारे, रामकिसन खेडकर, डमरे, हिंमत जाधव, सुधीर नगरे यांनी ही कारवाई केली. कारवाईनंतर दोन्ही मोटारी दारूबंदी विभागाच्या कार्यालयात आणण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2014 3:25 am

Web Title: illegal alcohol seized in sangamner
Next Stories
1 आ. कांबळे यांना अटक व सुटका
2 नगराध्यक्षपदासाठी वाई व पाचगणीत तीन अर्ज
3 अतिक्रमणविरोधी मोहीम सुरूच
Just Now!
X