03 August 2020

News Flash

विटा आणि तासगावमध्ये १५ लाखांची बेहिशोबी रोकड हस्तगत

विटा व तासगाव येथे नगरपालिका निवडणूक सुरू असून पोलिसांनी गस्त सुरू केली आहे.

नागपूरात १ कोटी रुपये जप्त

नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गस्त घालत असताना विटा आणि तासगावमध्ये १५ लाखांची बेहिशोबी रोखड हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

विटा व तासगाव येथे नगरपालिका निवडणूक सुरू असून पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. शनिवारी रात्री पोलिसांची विटा शहरात नाकाबंदी सुरू असताना हुंडाई मोटार (क्र. एमएच १०-सीए ८८९९) या वाहनाची तपासणी संशयावरून करण्यात आली. मोटारीमध्ये सात लाख रुपयांची जुन्या ५०० रुपयांच्या चलनातील रोकड मिळाली. याप्रकरणी इरफान गफूर तांबोळी व ित्रबक तांदळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना खुलासा करता आला नाही. तसेच तासगावमध्येही नाकाबंदी सुरू असताना रात्री ९ च्या सुमारास कॉलेज कॉर्नर दत्त माळ येथे साताऱ्याहून आलेल्या मोटारीची (एमएच ११ वाय ३४५२) या वाहनाची झडती घेतली असता ८ लाख ३१ हजार रुपये मिळाले. या प्रकरणी मोटारीत असलेल्या अश्विन तानाजी कट्टे (रा. गोंदवले ता.माण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2016 2:09 am

Web Title: illegal cash grab in vita tasgaon
Next Stories
1 हर्णे बंदरात दोन दिवसांत शंभर कोटींची उलाढाल
2 भंगार व्यापाऱ्याच्या कारमध्ये सापडली ४ कोटींची रोकड
3 लाच देण्यासाठी दोन हजाराच्या नोटांचा वापर!
Just Now!
X