बेडर माफियांकडून स्वामित्त्व धन बुडवून भरावाचे काम

हेमेंद्र पाटील, बोईसर

तारापूर औद्योगिक क्षेत्रात खैरापाडा उड्डाणपुलाजवळ बेकायदा मुरूम भरावाला पालघर तहसीलदार यांनी लाखो रुपयांची नोटीस बजावूनही या ठिकाणी मुरूम मातीचा भराव भर दिवसा सुरूच आहे. महिना उलटूनही शासनाने स्वामित्व धन बुडविणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

औद्य्ोगिक क्षेत्रात खैरापाडा उड्डाणपुलालगत असलेल्या १३ हजार २०० चौरस मिटर भूखंडावर जे. एस. डब्ल्यू स्टिल कोटेड प्रोडक्टस’ला सुशोभीकरण आणि उद्यानासाठी करारावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिला आहे. याठिकाणी बेकायदा गौणखनिज स्वामित्वधन बुुडवून ठेकेदारांने मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव केला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ सहदैनिकाने प्रसिद्ध करून त्यांचा पाठपुरावा केला होता. यामुळे खडबडून जागे झालेल्या पालघर महसूल विभागाने बेकायदा माती भरावाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७)नुसार दंडात्मक कारवाई करत मुरूम माती बाजार भावाप्रमाणे प्रति ब्रास रक्कम व रक्कमेच्या पाचपट दंड असा ९७ लाख ५० हजार ५५६ रूपयाच्या नोटीस संबंधित कारखानदाराला २६ जुन २०१९ रोजी बजावली होती. मात्र महिना उलटून गेल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारचा दंडाची वसुली करण्यात आली नसुन पुन्हा बेकायदा माती भराव सुरूच आहे.

पालघर तहसीलदार यांनी मुरूम मातीच्या भरावाला बजावलेल्या नोटीसी मध्ये आपली कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधित कारखानदाराला फक्त एक दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र नोटीस बजावुन वेळ निघुन गेल्यानंतर देखील संबंध कारखानदारांने आपल्या कडील गौणखनीजाच्या स्वामित्वधनाच्या सत्य प्रती तहसीलदार पालघर यांच्या कडे सादर करू शकले नव्हते. तरी देखील पालघर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दंडात्मक रक्कम वसुल करण्यासाठी विलंब केला आहे. ज्या ठिकाणी भरावाबाबत नोटीस बजावली आहे त्याठिकाणी शुRवारी २० जुलै रोजी सायंकाळी पुन्हा चोरटय़ा पध्दतीने मुरूमाचा भराव केला जात असल्याचे समोर आले आहे. येथील महसूल विभागाचे तलाठी कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असताना पुन्हा बेकायदेशीर भराव सुरू असल्याचे त्यांना समजले त्यांनी लागलीच आपले कर्मचारी यांना सांगुन भराव सुरू असलेल्या ठिकाणी पाठवले असता. मातीचा भराव करणारम्य़ा वाहनचालकांकडे स्वामित्वधनाची त्यावेळेची पावती नसल्याचे दिसून आले.

खैरापाडा येथे सुरू असलेल्या माती भरावाच्या ठिकाणी सुरू असलेल्या एका वाहनांना गौणखनीज पुरवठादार दिवसातुन एखाद दुसरी गौणखनीज स्वामित्वधनाची पावती देवुन त्यावरच पुर्ण दिवस बेकायदा वाहतूक केली जाते. शुक्रवारी पकडलेल्या मातीच्या वाहतूक करणाऱ्यांकडे दुपारी दोन वाजताच्या सुमार काढलेली गौणखनीज स्वामित्वधनाची पावती महसूल विभागाच्या कर्मचारम्य़ांना दाखवण्यात आली होती. पावसामुळे मुरूम माती वाहतूक करणारे वाहन मातीमध्ये अडकल्याने वाहन त्याच ठिकाणी अडकले होते. यामुळे तलाठय़ांच्या कर्मचारी यांना वाहन ताब्यात घेता आले नाही. याचाच फायदा घेत गौणखनिज माफियांनी दुसऱ्या दिवसाआधीचवाहन त्याठिकाणा हुन काढत विषय संपविण्याचा प्रयत्न केला होता. गौणखनीज माफियांची स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर नेहमीच दहशत असल्याचे दिसून येते.

दंडाच्या नोटीसी बाबत लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांना सुचना त्वरित करण्यात येतील. तसेच त्याठिकाणी सुरू असलेल्या भरावाच्या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.

-विकास गजरे, प्रांत अधिकारी पालघर