लॉकडाऊनमुळे  अर्थव्यवस्था तब्द झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. देशातील बहुतेक राज्य सरकारे आर्थिक अडचणीत आहेत. केंद्र सरकारकडून मदत मिळावी म्हणून अपेक्षा आहे परंतु केंद्र सरकार जीएसटी परतावा देत नाहीत त्यामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी कर्ज घेतले आहे. जानेवारी पर्यंत आर्थिक सुधारणा अपेक्षित आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

दिवाळीनंतर अवैध दारूचा बीमोड करण्यासाठी गृह आणि उत्पादन शुल्क खात्यांच्या मंत्र्यांची एकत्रित बैठक घेऊन संयुक्त कारवाई करण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. अल्पवयीन मुले जर अवैध धंद्यमध्ये सहभागी होत असतील तर कायद्यंमध्ये कडक उपायोजना कराव्या लागतील, जरूर तर मोक्का कायद्यन्वये कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी येथे दिला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, युवकचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, नगरसेवक अबीद नाईक, व पदाधिकारी उपस्थित होते.  आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकानिहाय बैठका घेऊन आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम बांधणी करण्यासाठी हा आढावा होता. बुथ पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम करून सिंधुदुर्ग विकासामध्ये अग्रेसर व्हावा यासाठी आपला प्रय आहे तसेच पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद होती तशी  निर्माण करण्याचा देखील प्रय सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.  महा विकास आघाडी सरकार राज्यात आहे. पुढील येणारम्य़ा निवडणुका देखील महा विकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्रय राहील असे जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यपालांकडे महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ सदस्यांची नावे दिली आहेत त्यांच्यावर राज्यपाल लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे असे  पाटील यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प संबंधातील आढावा, तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील कामे आणि पुनर्वसन याबाबत दिवाळीनंतर बैठक आयोजित करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नव्हे तर कोकण विभागा मधील सर्व जिल्ह्यांच्या पर्यटन विकासाची संकल्पना आमच्या सरकारने विचारात आणली आहे प्राधान्याने पर्यटन योजना राबविल्या जातील परंतु करोनामुळे सर्वच थांबले आहे, असे ते म्हणाले.