जगावर असणारं करोनाचं संकट टळण्याकडे लक्ष लागलं असतानाच नव्या करोना अवताराचं सावट गडद होऊ लागलं आहे. भारतात मंगळवारी करोनाच्या नव्या विषाणूंची लागण झालेले काही रुग्ण आढळले. यामुळे खबरदारी घेतली जात आहे. १ जानेवारी २०२१पासून हळूहळू सारं पूर्वपदावर येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच राज्यात ३१ जानेवारीपर्यंत ‘मिशन बिगीन अगेन’ लागू राहील असं जाहीर करण्यात आलं आहे. याचसोबत ‘थर्टीफर्स्ट’च्या आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्यांनाही काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एक नोटीस आली अन् पक्ष हादरला…- राम कदम

“करोनाचे संकट आ वासून उभे आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने करा. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र रात्री ११ वाजल्यानंतर हे सर्व बंद होणार आहे. याचाच अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने असणार आहेत. त्यामुळे जनतेने राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे”, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यतील जनतेला दिल्या आहेत.

अर्णब गोस्वामी यांची त्यांच्याच शो मध्ये ‘बोलती बंद’; चर्चेसाठी आलेल्या प्रवक्त्याने सुनावलं…

मोठ्या शहरातील (मेट्रो सिटी) आणि हिल स्टेशन असलेल्या शहरांमध्ये किंवा ठिकाणांच्या बाबतीतही हेच निर्बंध पाळण्याच्या सूचना संबंधित जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिल्या असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.