11 August 2020

News Flash

औरंगाबाद जिल्ह्यात आज ६६ नव्या करोनाबाधितांची नोंद, एकूण संख्या ९ हजार ५१० वर

३ हजार ६४१ जणांवर उपचार सुरू

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. करोनाचा वाढता संसर्ग पाहाता औरंगाबादमध्ये १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र तरी देखील येथे दररोज करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

आज सकाळी औरंगाबादमध्ये ६६ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्णा आढळले असून, जिल्ह्यातली करोनाबाधितांची एकूण संख्या ९ हजार ५१० वर पोहचली आहे. जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १ हजार ५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ९ हजार ५१० करोनाबाधितांपैकी ५ हजार ४९९ जणांना करोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत ३७० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीस जिल्ह्यात ३ हजार ६४१ जणांवर उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या ६६ रुग्णांमध्ये औरंगाबाद शहर हद्दीतील २१ तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे. सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 11:37 am

Web Title: in aurangabad district 66 new corona patients were registered today msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्यात ‘एनडीआरएफ’ची दोन पथके दाखल
2 ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवण्‍याचा अध्‍यादेश सरकारनं त्‍वरीत मागे घ्‍यावा : सुधीर मुनगंटीवार
3 रायगड जिल्ह्यात आजपासून पुन्हा टाळेबंदी सुरू
Just Now!
X