देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमध्ये करोनाबाधितांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात 150 नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या तब्बल 6 हजार 680 वर पोहचली आहे.

आज आढळलेल्या 150 करोनाबाधितांमध्ये औरंगाबाद शहरातील 101 व ग्रामीण भागातील 49 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये 85 पुरुष व 65 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत आढळलेल्या 6 हजार 680 करोनाबाधितांपैकी 3 हजार 374 रुग्णांनी करोनावर मात केलेली आहे. 3 हजार 196 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, करोनामुळे आतापर्यंत 310 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे. तपासणी करण्यात आलेल्या 934 स्वॅबपैकी आज 150 रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

औरंगाबाद शहर हद्दीतील 101 रुग्णांमध्ये घाटी परिसर (1), जाधव मंडी (3), अरिष कॉलनी (3), सिडको एन-11 (3), दिल्ली गेट (1), गजानन नगर (4), पुंडलिक नगर (1), छावणी (2), किराणा चावडी (1), एन 11 हडको, (1), आदर्श कॉलनी गारखेडा (1), नाईक नगर (4), उस्मानपुरा (5), उल्कानगरी (2),शिवशंकर कॉलनी (8), एमआयडीसी, चिखलठाणा (1), मातोश्री नगर (2), नवजीवन कॉलनी (1), श्रध्दा कॉलनी (1), एन-6 (1), एन-2 सिडको, ठाकरे नगर (1), जटवाडा रोड (1), पोलिस कॉलनी (2), दशमेश नगर (7), वेदांत नगर (1), टिळक नगर (1), एन-9 सिडको (1), प्रगती कॉलनी (1), देवळाई, सातारा परिसर (2),जयभवानी नगर (3), अंबिका नगर (1), गजानन कॉलनी (3), पद्मपुरा (15), सिंधी कॉलनी (1),पडेगाव (2), सिल्क मिल कॉलनी (4), रेल्वे स्टेशन परिसर (4), टिव्ही सेंटर (4), अन्य (1) या भागांमधील रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील 49 रुग्णांमध्ये विहामांडवा (1), सिध्देश्वर नगर, सुरेवाडी (1), कारंजा (1), वाळुज (1), हिरापुर सुंदरवाडी (3), स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (2), वडगांव बजाज नगर (2), निलकमल सोसायटी, बजाज नगर (4), साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर (5), साऊथ सिटी, बजाज नगर (1), दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी (1), सायली सोसायटी बजाज नगर (3), शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी (2), जिजामाता सोसा.बजाज नगर (3), पंचगंगा सोसा. बजाजनगर (1), विश्व विजय सो. बजाजनगर (2), डेमनी वाहेगांव (3), पैठण (3), इंदिरा नगर, वैजापुर (5), अजिंठा (2), शिवणा (1) या भागातील रुग्ण आढळले आहेत.