News Flash

औरंगाबाद जिल्ह्यात आज 102 करोनाबाधितांची वाढ ; एकूण संख्या 3 हजार 340 वर

सद्यस्थितीस 1 हजार 380 रुग्णांवर उपचार सुरू

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख शहरांपैकी मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यात देखील करोनाबाधितांची संख्या दररोज कमालीची वाढत आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात 102 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, जिल्ह्यातील करोनबाधितांची एकूण संख्या आता 3 हजार 340 वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस 1  हजार 380 रुग्णांवर उपचार सुरू असून, 1 हजार 781 जण उपचारानंतर घरी गेले आहेत. आतापर्यंत 179 जणांचा करोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या 102 करोनाबाधितांमध्ये 47 महिला व 55 पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आढळेल्या रुग्णांमध्ये नवजीवन कॉलनी (1), गरम पाणी (1), पडेगाव (1), जाधववाडी (2), राजाबाजार (1), एन नऊ हडको (1), ठाकरे नगर (1), बजाज नगर (1), एन सहा (1), शिवाजी नगर (1), नागेश्वरवाडी (3), शिवशंकर कॉलनी (2), गजानन नगर (2), छत्रपती नगर (1), दर्गा रोड (1), एकता नगर, हर्सुल (1), हनुमान नगर (1), सुरेवाडी (3), टीव्ही सेंटर (1), एन आठ सिडको (1), श्रद्धा कॉलनी (4), एन सहा, सिंहगड कॉलनी (1), आयोध्या नगर (1), बायजीपुरा (3), कोतवालपुरा (1), नारळीबाग (1), अंबिका नगर, मुकुंदवाडी (4), गल्ली नंबर दोन पुंडलिक नगर (1), समता नगर(1), सिंधी कॉलनी (1), बजाज नगर (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), जयसिंगपुरा (2), , सिडको एन अकरा (1), नेहरू नगर, कटकट गेट (1), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर, नक्षत्रवाडी (1), भाग्य नगर (4), शिवाजी नगर (1), पदमपुरा (1), उत्तम नगर (2), खोकडपुरा (2), टिळक नगर (1), पिसादेवी (1), बीड बायपास (2), सखी नगर (3), जिल्हा परिषद परिसर (1), सारा गौरव बजाज नगर (3), सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर (6), पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर (4), जय भवानी चौक, बजाज नगर (1), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (3), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (1), दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर (1), देवगिरी मार्केट जवळ बजाज नगर (2), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), मांडकी (1), पळशी (5), जय हिंद नगरी, पिसादेवी (1), कन्नड (1), मातोश्री नगर, औरंगाबाद (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

शहरातील खासगी रुग्णालयात काल सायंकाळी मंजुरपुऱ्यातील एका 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे, घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 131, शहरातील खासगी रुग्णलायांमध्ये 47व मिनी घाटीमध्ये एकाचा मृत्यू झालेला असल्याने आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 179 वर पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 10:38 am

Web Title: in aurangabad district the number of corona patients increased by 102 today msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘कर्जमुक्ती’च्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांचे पीक कर्ज अधांतरी
2 “… मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची?”; जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
3 धक्कादायक : सोलापुरात १०२ नवे करोनाबाधित; ९ जणांचा मृत्यू
Just Now!
X