राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद शहरातही करोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात 192 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 5 हजार 757 वर पोहचली आहे.

आज आढळलेल्या 192 करोनाबाधितांमध्ये 115 पुरूष व 77 महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील 116 रुग्ण व ग्रामीण भागातील 76 रुग्णांचा समावेश आहे.

सद्यस्थितीस 2 हजार 753 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2 हजार 741 जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत 263 जणांचा करोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे. परीक्षण करण्यात आलेल्या 866 स्वॅबपैकी 192 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये फातेमा नगर, हर्सुल (1), जुना बाजार (1), शिवशंकर कॉलनी (2), एन दोन, विठ्ठल नगर (2), न्यू पहाडसिंगपुरा (2), हर्सुल (3), नंदनवन कॉलनी (2),पुंडलिक नगर (3), विवेकानंद नगर (2), विशाल नगर (5), सातारा परिसर (6), एन चार सिडको (1), संजय नगर, मुकुंदवाडी (2), रेणुका नगर (3), सिंधी कॉलनी (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (1), न्यू हनुमान नगर (4), शिवाजी नगर (9), आंबेडकर नगर (2), विजय नगर (2), पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर (2), एन अकरा,पवन नगर (1), मुकुंदवाडी (4), एन सहा सिडको (1), जाफर गेट (1), आकाशवाणी परिसर (1), उस्मानपुरा (1), जाधववाडी (1), एन दोन, सिडको (2), सातव नगर (1), नूतन कॉलनी (1), टीव्ही सेंटर (1), गारखेडा (4), एम दोन, सिडको (2), सुरेवाडी (5), विष्णू नगर (1), गजानन नगर (1), रायगड नगर, एन नऊ (1), पडेगाव (1), छावणी (1), समर्थ नगर (1), भाग्य नगर (1), हिंदुस्तान आवास (5), उत्तम नगर (3), तानाजी नगर (5), शिवाजी कॉलनी (1), हनुमान नगर (4), कैलास नगर (1), जय भवानी नगर (1), जाधवमंडी (1), स्टेशन रोड परिसर (1), अहिंसा नगर (1), गादिया विहार (1), देवळाई (1), अन्य (2) या औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये हनुमान नगर, वाळूज (2), कन्नड (1), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (2), सिंहगड सो., बजाज नगर (1), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (3), सारा गौरव, बजाज नगर (1), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (4), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (3), क्रांती नगर, बजाज नगर (1), शहापूरगाव, बजाज नगर (1), बजाज नगर (2), वडगाव, शिवाजी चौक, बजाज नगर (2), स्नेहांकित सो., बजाज नगर (1), साईनगर, बजाज नगर (1), रांजणगाव (2), वाळूज महानगर सिडको (1), साऊथ सिटी (4), बीएसएनएल गोडावून, बजाज नगर (1), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (1), अयोध्या नगर, बजाज नगर (1), उत्कर्ष सो. बजाज नगर (1), बजाज विहार, बजाज नगर (1), स्वामी सो., बजाज नगर (1), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), बजाज नगर (1), रामपूरवाडी, करंजखेड, कन्नड (3), नागद तांडा, कन्नड (1), कुंभेफळ (6), फर्श मोहल्ला, खुलताबाद (2), राजीव गांधी, खुलताबाद (1), पाचोड (1), खुलताबाद रोड, फुलंब्री (1), हरिओम नगर, रांजणगाव, गंगापूर (2), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), कान्होबा वाडी, मांजरी (1), अजब नगर, वाळूज (1), दर्गाबेस, वैजापूर (11), पोखरी, वैजापूर (2), बाभूळगाव (1), साकेगाव (2) येथील करोनाबाधित रुग्ण आहेत.