राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्हयातील करोनाबाधितांची संख्या देखील कमालीची वाढतान दिसत आहे. आज सकाळी औरंगाबादमध्ये 230 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 4 हजार 266 वर पोहचली आहे. काल औरंगाबादेत 125 नवे कोरनाबाधित आढळल्याची सकाळी नोंद झाली होती.

जिल्ह्यातील एकूण 4 हजार 266 रुग्णांपैकी 2 हजार 217 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आतापर्यंत उपचारादरम्यान 218 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. सद्यस्थितीस 1 हजार 831 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 230 रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील १२४ व ग्रामीण भागातील १०६ जणांचा समावेश आहे. यामध्ये 77 महिला व 153 पुरूष आहेत.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील समता नगर (1), चिकलठाणा (1),नुतनकालनी (1), घाटी परिसर (1), संजयनगर मुकुंदवाडी (1), अंगुरीबाग (6), श्रीकृष्ण नगर, टिव्ही सेंटर (1), हिनानगर चिखलठाणा (1), सईदा कॉलनी (1), केशरसिंग पुरा (4), अरिहंत नगर (1), व्यंकटेश कॉलनी (1), जुने पडेगांव (4), पडेगांव (9), नक्षत्रवाडी (1),गजाजन कॉलनी (9), शिवाजी मंडी, नारेगांव (1), इंदिरा नगर, गारखेडा (2), पुंडलीक नगर (1), संत तुकाराम नगर एन-2 सिडको (3), आझाद चौक (1), शिवशंकर कॉलनी (5), गजानन नगर (1), उत्तम नगर (1), विठ्ठल नगर (1), जाधववाडी (1), राजे संभाजी नगर, जाधववाडी (2), जय भवानी नगर (7), एन-12 शिवछत्रपती नगर (1), बंजारा कॉलनी (1), जिजामाता कॉलनी (2), नवजीवन कॉलनी (2), न्यु गजानन कालनी गारखेडा (1), एन-6 सिडको (2), चिखलठाणा, बौध्दवाडा (1), अन्य (2), एन-11 मयुरनगर (1), सी-8 सिडको (1), रामनगर (1), एन-5 सिडको (1), मुजीब कॉलनी (1), द्वारका नगर (1), संभाजी नगर, एन-6 सिडको (1), शिवाजी नगर (2), हडको, एन-2 (1), एन-8 सिडको (2), नेहरु नगर, कटकट गेट (1), रामनगर एन-2 सिडको, (1), मुकुंदवाडी (1), स्वामी विवेकानंद नगर, एन-12 हडको (1), नागेश्वरवाडी (1), उदय कॉलनी (1), न्यु हनुमान नगर (1), गारखेडा परिसर (1), समर्थ नगर (4), भारतमाता नगर (1), नागसेन कॉलनी (2), कॅनॉट प्लेस (6), एन-5 (1), सिध्दार्थ नगर (1), श्रीकृष्ण नगर, एन-9(1), जयभवानी नगर (2), कैलास नगर (3), चिखलठाणा (1), आनंद नगर (1) या भागांमधील रुग्ण आहेत.

तर, ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये सावता नगर, लक्ष्मी माता चौक, रांजणगाव (1), शिवालय चौक, बजाजनगर (1), बजाजनगर (12), सम्यक गार्डन शेजारी, वाळुज (1), दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर (1), वडगांव कोल्हाटी , बजाजनगर (1), करमाड (1), हिवरा (2), पांढरी पिंपळगाव (1), पळशी (4), सिडको महानगर (8), जयभवानी चौक, बजाज नगर (3), यशवंती हाऊसिंग सोसा. (5), राजा हंसचंदा सोसा. बजाज नगर (2), मीराताई कालनी साई मंदिराजवळ, बजाजनगर (1), गुलमोहर हाऊ. सोसा, बजाज नगर (1), मातोश्री हाऊ सोस, बजाजनगर (1), जागृती हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (1), बीसएनएल गोदामाशेजारी (1), आंबेडकर चौक, बजाजनगर (1), शिवालय कॉलनी, बजाजनगर (1), व्दारका नगर, बजाज नगर (1), वृंदावन हॉटेल शेजारी (1), सप्तश्रृंगी हौ.सोसा., बजाज नगर (6), साई नगर, बजाज नगर (1), गणेश हॉ. सो. बजाज नगर (1), तोरणा हौ.सोसा. बजाज नगर (2), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (1), अश्वमेघ हौ.सोसा.बजाज नगर (1), सह्याद्री हौ. सोसा. बजाज नगर (1), अर्बन व्हॅली (2), घृष्णेश्वर हॉस्पिटल परिसर, बजाज नगर (1), दत्तकृपा हौ.सो., बजाज नगर (3), दिग्विजय हौ.सो.बजाज नगर (1), शिवालय हौ.सो., बजाज नगर (3), श्रीराम प्लाझा, बजाज नगर (3),शेवता फुलंब्री (1), समर्थ नगर (2), जयसिंग नगर (5), लासुर नाका (3), शिक्षक कॉलनी (1), पदमपुर (1), मारवाडी गल्ली (1), प्रगती कॉलनी (1), फुले नगर (1), गोदावरी कॉलनी (1), गलनिंब, गंगापुर (1), माऊली नगर, गंगापुर (2), बजाज नगर, गंगापुर (1), तुर्काबाद, गंगापुर (2), मांजरी, गंगापुर (1), वाळुज, गंगापुर (3) येथील रुग्णांचा समावेश आहे.