News Flash

पुणे : चालत्या एसटीत तरुणाची हत्या, अश्लील फोटो व्हायरल प्रकरण

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक थरारक घटना घडली असून धावत्या एसटीमध्ये एका तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक थरारक घटना घडली असून धावत्या एसटीमध्ये एका तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात धावत्या एसटीमध्ये एका तरुणाने आपल्या मामे भावावरच कोयत्याने सपासप वार करुन हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली असून सगळीकडे या घटनेबाबतच चर्चा सुरु आहे. बहिणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यामुळे आरोपीने हा हल्ला केल्याचे पोलीस सुत्रांकडून कळते. आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत तरुणाच्या नातेवाईक आणि नागरिकांनी केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खेडमधील दावडी येथून पीडित तरुणीचा १७ वर्षीय भाऊ आणि आरोपी सकाळी सात वाजता भोलेगाव-राजगुरुनगर जाणाऱ्या एसटीत बसले. त्यानंतर एसटी थोडी पुढे जाताच आरोपीने पाठीमागून पीडित मुलीच्या भावावर सपासप वार करून त्याची निर्घुन हत्या केली. धावत्या एसटीत प्रवाशांदेखत भरदिवसा हा थरार घडला. त्यानंतर हल्लेखोर तरुण फरार झाला.

मृत तरुणाच्या बहिणीचे आरोपीशी प्रेमसंबंध होते, तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. पुण्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयात इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या या दोघांच्या भेटीगाठीही सुरू होत्या. मात्र, खिसे कुटुंबीयांनी या लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर चिडलेल्या आरोपीने मृत तरुणाच्या बहिणीचे अश्लील फोटो अन खाजगी मचकूर फेसबुकवर पोस्ट केला.

या प्रकारानंतर पीडित तरुणीने आठ जून रोजी खेड पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीचा चांगलाच पारा चढला. त्यानंतर आज सकाळी त्याने आपल्या फेसबुकवर ‘माफ कर दो भाईलोग, बहुत तडफा हु. मेरी तरफ से भी सोच लो, उसको भी तडपणा चाहिये’ असा मजकूर पोस्ट केला. त्यानंतर सकाळी सात वाजता दावडी येथून आरोपी आणि पीडित तरुणीचा भाऊ बसमध्ये बसले, आणि काही वेळात हे हत्याकांड घडले.

या हत्या प्रकरणानंतर झोप उडालेल्या पोलिसांनी आता आरोपी तरुणाच्या शोधात चार पथके रवाना केली आहेत. तर, या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला असल्यास कडक कारवाईचे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले. पोलिसांनी या प्रकरणी हलगर्जीपणा करीत आरोपीवर तत्काळ कारवाई करण्याऐवजी त्याला मोकाट सोडले होते. त्यामुळेच आरोपीने पीडित मुलीच्या भावावर कोयत्याने हल्ला करीत त्याची हत्या केली, असे सूत्रांकडून कळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 11:17 am

Web Title: in khed taluka youth brutaly murdered at st bus obscene video in viral case
Next Stories
1 पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून 8 ते 10 वाहनांची तोडफोड
2 ‘तो’ शहरात आलाय पण, बरसलाच नाही..!
3 परताव्याचे जुनेच पर्याय कायम
Just Now!
X