खोपोलीमध्ये एनआरसी व सीएए विरोधात निघालेल्या मोर्चाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. खालापूर तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील हा सर्वात मोठा मोर्चा ठरला. या मोर्चाला मोठया प्रमाणावर खालापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला
खोपोलीतील शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन जवळ जवळ तीन किमी चालत हा मोर्चा खोपोली गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
या सभेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मार्गदर्शन करीत सरकारचा खोटारडेपणा समोर आणला. या मोर्चामध्ये सर्व सामाजातील लोकांनी प्रतिसाद दिला. हिंदू, बौद्ध, मुस्लीम व सर्वच समाजातील लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला. जवळ जवळ १५ हजार पेक्षा जास्त सविधान समर्थकांनी यावेळी हजेरी लावली. व्यासपीठावर खोपोली नगराध्यक्ष सुमन औसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद राईलकर उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 4, 2020 5:03 pm