20 October 2020

News Flash

कोल्हापूर: शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने एसटी जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे एसटी बसला अचानक आग लागली

कोल्हापूर येथे आज (शनिवार) शॉर्टसर्किटमुळे एसटी बसला अचानक आग लागली. कोल्हापूर-गारगोटी ही एसटी हणबरवाडी जवळ आल्यानंतर ही घटना घडली.

कोल्हापूर येथे आज (शनिवार) शॉर्टसर्किटमुळे एसटी बसला अचानक आग लागली. कोल्हापूर-गारगोटी ही एसटी हणबरवाडी जवळ आल्यानंतर ही घटना घडली. यात जीवितहानी झाली नाही. मात्र बस संपूर्णपणे जळून खाक झाली. अचानक आग लागल्याने उडालेल्या धावपळीत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले.

एसटी घेऊन जात असताना चालकाला आग लागल्याचे लक्षात आले. आग चालकाच्या बाजूला असलेल्या बोनेटला लागली. त्याने लगेचच एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याकडे नेली. आग लागल्याचे पाहून भांबावलेल्या प्रवाशांनी बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे काही प्रवासी यात जखमी झाले. जखमींवर त्वरीत उपचार करण्यात आले. ही कोल्हापूर आगाराची बस होती. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येते. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 2:14 pm

Web Title: in kolhapur st bus burnt out
Next Stories
1 मतदारांना भेटवस्तू देऊन संपर्क वाढवा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना सल्ला
2 संगणकीय प्रणालीव्दारे अभ्यागतांची नोंद
3 बीटी कापूस बियाण्यांबाबत कंपन्यांची चौकशी
Just Now!
X