नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या ३७ हजारांच्या पुढे गेली आहे. शहरात आजपर्यंत एकूण ७५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.तर दुसरीकडे शहरात करोनामुक्तीचा दर ८८ टक्के झाला आहे. शहरात  एकूण ३७ हजार ०५६ करोनाबधित झाले आहेत.आज शहरात ३८३ नवे करोनाबधित रुग्ण आढळले आहेत.

नवी मुंबई शहरात  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या ३७  हजाराच्या पुढे गेली आहे. तर शहरात आज ४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ७५४ झाली आहे. शहरात   ३,६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत एकूण २,०१,३९२  चाचण्या  करण्यात आल्या असून करोनामुक्तीचा दर  वाढला आहे. तर शहरातील मृत्यूदरही कमी झाला आहे.