News Flash

जन्मानंतर अवघ्या ६ मिनिटात मुलीला मिळाला आधार क्रमांक 

दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी झाला भावना जाधवचा जन्म

प्रतिकात्मक फोटो

तुम्ही तुमचे आधार कार्ड काढले आहे का? नसेल तर या मुलीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा आणि तातडीने आधार कार्ड काढा. भावना संतोष जाधव या मुलीचा जन्म महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका रूग्णालयात आज (रविवार) दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी झाला. त्यानंतर १२ वाजून ९ मिनिटांनी तिला आधार क्रमांक मिळाला. होय जन्म झाल्यानंतर अवघ्या ६ मिनिटात तिला तिचा आधार नंबर मिळाला आहे. तिच्या आई वडिलांनी याबाबत सजगता दाखवल्याने हे शक्य झाले आहे.

भावनाच्या आई वडिलांनी तिच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. त्यानंतर त्यांना तिचा जन्माचा ऑनलाईन दाखला आणि आधार नंबर मिळाला. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) तर्फे तातडीने तिच्या जन्माची नोंद करण्यात आली अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या संदर्भातील बातमी दिली आहे.

लवकरच आम्ही सगळ्या लहान मुलांचे आधार क्रमांक त्यांच्या आई वडिलांच्या आधार क्रमांकाशी जोडणार आहोत. आज जन्मलेल्या भावनाची आणि तिच्या आईची प्रकृती आता चांगली आहे अशी माहिती रूग्णालयातील डॉक्टर एकनाथ मळे यांनी दिली. एवढेच नाही तर मागील वर्षभरात उस्मानाबाद मध्ये १३०० मुलांनी जन्म घेतला या सगळ्यांना आधार क्रमांक मिळाले आहेत असाही दावा डॉक्टर मळे यांनी केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2017 6:55 pm

Web Title: in maharashtra a baby girl gets aadhaar number in 6 minutes of birth
टॅग : Osmanabad
Next Stories
1 जुलै २०१८, टीम इंडियाची ‘विराट’ परीक्षा ! इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
2 देखाव्यातून ‘महाराष्ट्राची लोकधारा’ टिकवण्याचा जवळेकर कुटुंबाचा प्रयत्न
3 ‘वॉटर कप’ स्पर्धेतील यशानंतर उत्साह आणखी दुणावला
Just Now!
X