महाराष्ट्रात सलग तिसऱ्यादिवशी करोना बाधितांपेक्षा करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात मागच्या २४ तासात १४ हजार ५७८ जणांना करोना व्हायरसची लागण झाली. आज ३५५ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. आज दिवसभरात करोनामुक्त झालेल्या १६,७१५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात आतापर्यंत एकूण १४ लाख ८० हजार ४८९ जणांना करोनाची लागण झाली आहे. यात ३९ हजार ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ९६ हजरा ४४१ जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात अजूनही २ लाख ४४ हजार ५२७ अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. कालही करोनाबाधितांपेक्षा महाराष्ट्रात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. मंगळवारी राज्यात एकूण १२ हजार ९५८ नवे करोना रुग्ण आढळले तर १७ हजार १४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.