महाराष्ट्र सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवला आहे. सध्या जे निर्बंध आहेत, ते ३० जूननंतरही कायम असणार आहेत. या लॉकडाउन दरम्यान आपल्याला कुठल्या नियमांच पालन करावं लागणार आहे, ते जाणून घेऊया.

– सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि वाहतुकीच्यावेळी चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक आहे.

– सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर राखणे सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक आहे.

– दुकानात गेल्यानंतर ग्राहकांमध्ये योग्य अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. एकाचवेळी पाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी देऊ नये.

– मोठया संख्येने लोकांना एकत्र जमता येणार नाही. लग्नसमारंभाला परवानगी आहे. पण पाहुण्यांची संख्या ५० पेक्षा जास्त नसावी.

– अंत्यविधीच्यावेळी सुद्धा ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.

– सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

– सार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू खायला मनाई आहे.

– कामाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर व बाहेर निघण्याच्या मार्गावर थर्मल स्क्रिनिंग करावे लागेल तसेच हँड वॉश, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.

– कामावर मानवी संपर्क येणाऱ्या प्रत्येक ठिकाणाची सतत स्वच्छता करावी लागेल.

– कर्मचाऱ्यांच्या शिफ्टच्या वेळा तसेच कामावर असताना कर्मचाऱ्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्याची जबाबदारी प्रमुखाची असेल.

– ३१ मे आणि चार जून २०२० च्या मार्गदर्शक तत्वांनुसार बिगर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील.