News Flash

ठाकरे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप – देवेंद्र फडणवीस

ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी...

“ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही. आम्ही आमच्यापरीने, क्षमतेने करोना संकटाशी लढतोय” असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात बोलत होते.

“आतापर्यंत देशाच्या पाठिवर असं तीन पक्षांच सरकार कधीच चाललेलं नाही. देशाच्या या इतिहासात महाराष्ट्र अपवाद ठरेल असं वाटत नाही. महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे एक दुंभगलेलं कुटुंब आहे. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आपसातील अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आणखी वाचा- शिवसेना म्हणते, “भाजपासोबत जाण्याची वेळ गेली… त्यांना शुभेच्छा”

“ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी मजबूत सरकार देण्याची जबाबदारी आमची असेल आणि आम्ही तसं सरकार देऊ” असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात अंर्तविरोधामुळेच सरकार पडेल. त्यासाठी कुठल्याही मिशनची गरज नाही असे फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा- ठाकरे सरकारमध्ये काही स्वयंघोषित मुख्यमंत्रीही; फडणवीसांनी डागली तोफ

“हे ऑटोरिक्षा सरकार आहे. ज्याची तीन चाक तीन दिशेला आहेत. रिक्षा स्थिर असते. ते सन्मानजनक वाहन आहे. पण रिक्षाची गती मर्यादीत असते. रिक्षामधून एका गावामधून दुसऱ्या गावाला जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ट्रेनची गरज लागते. हे क्षमता आणि मर्यादा असलेलं सरकार आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा- राज ठाकरे म्हणाले, “आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही, कारण…”

ठाकरे सरकार लिव्ह इन रिलेशनशिपचं सरकार असेल तर तुम्ही अजित पवार यांच्याबरोबर स्थापन केलेल्या सरकारला काय म्हणाल? त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘तो एक फसलेला प्रयत्न होता. त्यामुळे त्याला कुठलं नाव देता येणार नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 1:01 pm

Web Title: in maharashtra thackeray govt means leave in relationship dmp 82
Next Stories
1 ठाकरे सरकारमध्ये काही स्वयंघोषित मुख्यमंत्रीही; फडणवीसांनी डागली तोफ
2 अर्थव्यवस्थेला उभं करण्यासाठी आता धाडसी निर्णय घ्यावे लागतील – देवेंद्र फडणवीस
3 शुभ बोल रे नाऱ्या… राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सुभाष देसाईंची टीका
Just Now!
X