X
X

धक्कादायक! नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

READ IN APP

दोघा ऑटो चालकांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन दोघा ऑटो चालकांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी शुक्रवारी संध्याकाळी झाशीराणी चौकातून या १६ वर्षीय मुलीचे अपहरण केले. त्यानंतर आरोपी तिला यशोधरानगमध्ये घेऊन गेले.

बालाघाटा येथे तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केला. या नराधमाच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी ती मुलगी १०० मीटर अंतरापर्यंत धावतही गेली. रात्री १०.३० च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

20
X