नालासोपारा येथील निलेमोरे गावात आज सकाळी मासे पकडण्यासाठी उतरलेले तीन जण बुडाल्याची घटना घडली आहे. हे तीनही जण एकाच परिसरातील असून, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास यातील एक जण तलावात उतरला होता. तो सापडत नसल्याने इतर दोन जण त्याला शोधण्यासाठी तलावात उतरले आणि ते देखील बुडाले. सध्या अग्निशमन विभाग, पोलीस आणि स्थानिक राहिवाशांच्या मदतीने त्यांचे शोधकार्य सुरू आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, निलेमोरे येथील आदिवासी पाड्यातील रहिवाशी शानू शिनवार (वय ३५) हा शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मासे पकडण्यासाठी आपल्या १५ वर्षीय मुलागा दुर्वेश शनवार याला घेउन तलावावर आला होता.
दरम्यान शानू मासे पकडण्यासाठी तलावात उतरला होता. तर दुर्वेश किनाऱ्यावर होता. शानू मासे पकडत असताना त्यांचा शेजारी सुमेद खंदारे (वय २५) येथे आला. दुर्वेश आणि सुमेध चर्चा करीत असताना अचानक शानू गायब झाला. तो बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर हे दोघे पण तलावात उतरले आणि पाणी खोल असल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले.

अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती मिळतात त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांचा शोध सुरु केला मात्र, अद्यापही ते सापडलेले नाहीत.