News Flash

नांदेडमध्ये कुख्यात गुंडाकडून पोलिसाची डोक्यात दगड घालून हत्या

शिंदे हे गेल्या २५ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते.

नांदेडमध्ये कुख्यात गुंडाकडून पोलिसाची डोक्यात दगड घालून हत्या
शिंदे हे गेल्या २५ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते.

नांदेडमधील एका कुख्यात गुंडाने भरदिवसा एका पोलीस कर्मचाऱ्याची त्याच्या घरासमोरच डोक्यात दगड घालून हत्या केली. शिवाजी पुंडलिकराव शिंदे (वय ४७) असे मृत पोलिसाचे नाव असून ते स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. तर तुलजीतसिंग कन्हैय्यासिंग ठाकूर असे खून केलेल्या गुंडाचे नाव आहे. तुलजीतसिंग पसार झाला असून हत्येचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा प्रकार आज (रविवारी) नांदेड शहरातील दत्तनगर भागात शिंदेंच्या घरासमोरच घडला.

घटनेची अधिक माहिती अशी, शिंदे दत्तनगरातील आपल्या घराजवळ आले असताना तुलजीतसिंगने त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. शिंदे यांची हत्या केल्यानंतर तुलजीतसिंगने एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून घटनास्थळावरून काढता पाय घेतला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तुलजीतसिंगवर विविध गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे दाखल करण्यामागे शिंदे यांचाच हात असल्याच्या समजातून त्याने ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. शिंदे हे गेल्या २५ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते. ते मुळचे कंधार तालुक्यातील हाळदा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2018 4:40 pm

Web Title: in nanded a hooligan murdered to put on stone on a policemen
Next Stories
1 राष्ट्रवादीने आधी डल्ला मारला आता कसला हल्लाबोल?-उद्धव ठाकरे
2 ‘पुढची किमान दहा वर्षे विरोधक सत्तेवर येणार नाहीत’
3 लोकांच्या आठवणीतील मुंडे साहेब व्हायचंय- पंकजा मुंडे.
Just Now!
X