16 October 2019

News Flash

नाशिक आणि अंबरनाथमध्ये अवकाळी पाऊस

सलग दुसऱ्या दिवशी नाशिक आणि अंबरनाथमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. नाशिकमध्ये दुपारनंतर अचानक वातावरण बदलल व अवकाळी पावसाने हजेरी लावली.

(संग्रहित छायाचित्र)

सलग दुसऱ्या दिवशी नाशिक आणि अंबरनाथमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. नाशिकमध्ये दुपारनंतर अचानक वातावरण बदलल व अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला तालुक्यात पाऊस कोसळला. अचानक झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि मुरबाड परिसरातही अवकाळी पाऊस कोसळत आहे. पावसामुळे काही भागात वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढलेला असताना अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

सोसायटयाच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या तर काही ठिंकाणी झाडेही पडली. पंचवटीत गणेशवाडी मार्केटजवळ वादळी पावसामुळे एक झाड कोसळले पण कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. अचानक आलेल्या पावसामुळे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली.

काल शनिवारी कोल्हापूर आणि कोकणासह मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. कोल्हापूर, कोकण आणि मराठवड्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला होता. संगमेश्वर तालुक्यातील धामणी गोळवली येथे काही प्रमाणात गारा पडल्याची माहिती होती.

First Published on April 14, 2019 7:49 pm

Web Title: in nashik ambarnath rain