04 August 2020

News Flash

उस्मानाबाद शहरात एकाच कुटुंबातील ८ जणांना करोनाची लागण

जिल्ह्यातील आणखी ११ नवे कोरोनाबाधित आढळले

संग्रहित छायाचित्र

करोनाचा कहर जिल्ह्यात वाढत चालला असून जून महिन्याच्या सुरुवातीलाच शतकाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. मंगळवारी जिल्ह्यात आणखी ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता ८८ वर गेली आहे.

मंगळवारी उस्मानाबाद शहरातील सांजारोड भागातील उस्मानपुरा (संत गोरोबाकाका नगर) भागात ८ तर कळंब शहरात २ आणि तालुक्यातील शिराढोण येथे १ असे ३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. उस्मानाबाद शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण हे एकाच कुटुंबातील असून ते नळदुर्ग येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले होते.

तर कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव भागात आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील असून शिराढोण येथील काल मृत्यू पावलेल्या महिलेच्या नातवालाही करोनाची लागण झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून उस्मानाबाद, कळंब तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता अधिक वाढली आहे.

मंगळवारी ५५ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ११ पॉझिटिव्ह तर ४४ निगेटिव्ह आले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८८ वर पोहचली असून तिघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ५३ जणांवर उपचार सुरू असून ३२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 9:58 pm

Web Title: in osmanabad city 8 members of the same family infected with corona virus aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 अकोल्यात रुग्ण वाढीचे सत्र कायम, २२ नवे रुग्ण, संख्या ६२७
2 राज्यात २ हजार २८७ नवे करोना रुग्ण; १०३ जणांचा मृत्यू
3 गडचिरोली: करोनाची लागण झालेल्या सिरोंचा येथील रुग्णाचा हैद्राबादमध्ये मृत्यू
Just Now!
X