28 September 2020

News Flash

पिंपरीत-चिंचवडमध्ये १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात तब्बल १० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात तब्बल १० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास केली. याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून चालक हा पिंपरी-चिंचवड परिसरतील बड्या दुकानदारांना गुटख्याचा पुरवठा करत असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी वय-२९ असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. त्याला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी हा पहाटे साडेचार च्या सुमारास टेम्पो क्रमांक एम.एच-१२ एम. व्ही-१४६३ हा काळेवाडीहून शिवराज नगरकडे जात होता. तेव्हा गस्त घालत असलेल्या पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. त्याला काही अंतरावर जाऊन अडवले. टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये तब्बल १० लाख रुपयांचे विमल कंपनीच्या गुटख्याचे पॅकेट आढळून आले.

याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने येऊन पंचनामा करत चालकाला वाकड पोलिसाच्या स्वाधीन केलं आहे. याप्रकरणी फिर्याद देण्याचे काम सुरू आहे. चालक विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी हा शहरातील बड्या दुकानदारांना गुटखा पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप त्याने गुटखा कुठून आणला हे समजू शकले नाही. त्याचा तपास वाकड पोलीस करतील. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे यांच्या टीमने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 9:41 pm

Web Title: in pimpri chinchwad 10 lakh gutkha seized
Next Stories
1 भीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे पोलिसांनी पाच जणांविरोधात दाखल केले आरोपपत्र
2 मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या – पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा
3 डीएसकेंच्या अडचणीत आणखी वाढ, ‘महारेरा’ने दिला दणका
Just Now!
X