01 March 2021

News Flash

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलीवर केला बलात्कार

पिंपरी-चिंचवडमध्ये जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. या मुलीवर वडिलांप्रमाणेच आणखी दोन अनोळखी व्यक्तींनी बलात्कार केला. एकदा रेल्वेत आणि त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरात या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.

२०१६ ते २०१८ दरम्यान पीडित मुलगी राहत्या घरातून अनेक वेळेस पळून गेली. हैद्राबाद येथे रेल्वेमध्ये अनोळखी व्यक्तीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी सोलापूर रेल्वे स्थानकात आली तिथे देखील आणखी एका अनोळखी व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर हैद्राबाद येथे नातेवाईकांनी पीडित मुलीला हात पाय बांधून मिर्चीची धुरी देत मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

मुलगी मुबंई येथील सी.एस.टी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर सामाजिक संस्थांच्या संपर्कात आली. तिथे तिची चौकशी केल्यानंतर या सर्व धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अनोळखी आरोपी हे फरार आहेत तर मुलीच्या वडिलांना वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 2:39 pm

Web Title: in pimpri chinchwad fahter raped daughter
Next Stories
1 हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम टाटा-सिमेन्सला
2 सीएनजी दराचा भडका
3 पिंपरीत गस्तीमुळे पोलिसांच्या खिशावर ताण
Just Now!
X