रायगड जिल्ह्यात मागील २४ तासात करोनाचे ४३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १७४ जणांनी करोनावर मात केली आहे. चिंताजनक बाब म्हणजे सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २६० करोनाचे रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ४ हजार २९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरुच आहे. चोवीस तासात तब्बल ४३२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ७ हजार ७६३ वर पोहोचली आहे. २३६ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात ४३२ नव्या करोना बाधितांमध्ये  पनवेल मनपा हद्दीतील १५४, पनवेल ग्रामिण मधील ४०, उरण मधील १०, खालापूर २५, कर्जत १४, पेण ६७, अलिबाग ३७, मुरुड ०, माणगाव २१, तळा ०, रोहा २७, श्रीवर्धन ११, म्हसळा १५, महाड ११ पोलादपूर ० रुग्णांचा समावेश आहे. तर, दिवसभरात पनवेल मनपा २, कर्जत १, पेण २, रोहा १ ,म्हसळा येथे एका रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २६ हजार ९८१ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २६० करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४२३, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४१७, उरण मधील १८२,  खालापूर २५०, कर्जत ९७, पेण ३०४, अलिबाग २०५,  मुरुड ४८, माणगाव ७०, तळा येथील ४, रोहा ९८, सुधागड ०, श्रीवर्धन ४८, म्हसळा ५८, महाड ४३, पोलादपूर मधील १३ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्ता पर्यंत २१२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५५ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.
जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. पनवेल, उरण, पाठोपाठ, अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर आणि रोहा तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.