रायगड जिल्ह्यात करोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्कय़ांवर पोहोचले आहे. पण मंगळवारी दिवसभरात तब्बल २५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात ४०७ नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ५३१ रुग्ण बरे झाले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४७ हजार २०९ वर पोहोचली आहे. यापैकी ४१ हजार ९०७ रुग्ण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ४ हजार ११ करोनाचे अ‍ॅक्टीव रुग्ण आहेत. तर १२९१ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ४०७ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. यात पनवेल मनपा हद्दीत २३४, पनवेल ग्रामीण ५९, उरण १२, खालापूर १०, कर्जत १०, पेण १४, अलिबाग ३१, मुरुड २, माणगाव ६, तळा ०, रोहा १८, सुधागड २, श्रीवर्धन २, म्हसळा २, महाड ५, पोलादपूर येथील ० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या ४ हजार ०११ करोनाचे रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ८०५,  पनवेल ग्रामीण ६७८, उरण १४६, खालापूर १६९, कर्जत १२२, पेण १९५, अलिबाग ३८०, मुरुड १६, माणगाव १४२, तळा १२, रोहा १७७, सुधागड ३६, श्रीवर्धन २७, म्हसळा १५, महाड ४४, पोलादपूर येथील ४७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के आहे, तर मृत्यूदर ३ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२.३ आहे.

सिंधुदुर्गात २८४८ करोनामुक्त

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत २ हजार ८४८ करोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारी आणखी ६४ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल बाधीत आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधीत रुग्णांची संख्या ३ हजार ९२८ तर मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ९६ झाली आहे.अजून १९३ अहवाल प्रतिक्षेत आहेत