04 August 2020

News Flash

दुचाकी चोराला मिळवून दिला जामीन; मारहाण करीत वकिलाचीच पळवली पुन्हा दुचाकी

विचित्र घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ

संग्रहित छायाचित्र

साताऱ्यात गाडी चोरी प्रकरणी जामीन मिळवून देणार्‍या वकिलालाच मारहाण करुन चोरट्याने गाडी पळवल्याची घटना घडली आहे.
उंब्रज (ता. कराड) येथील पोलीस ठाण्यासमोरुनच गाडी चोरणार्‍या एका युवकाला उंब्रज पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने त्याची काल मुक्तता केली होती. मात्र, त्याला जामीन मिळवून देणार्‍या वकिलाला मारहाण करुन चोरट्याने त्याची गाडी पळवून नेण्याचा प्रकार काल रात्री सातारा शहरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विनोद पोपट कांबळे (वय २५, रा. चंदननगर, एमआयडीसी, सातारा) या युवकाला उंब्रजमध्ये पोलीस ठाण्यासमोरुनच दुचाकी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी दाखल गुन्ह्यात त्याला कराड येथील न्यायालयात हजर केले. मात्र, त्याचा जामीन अर्ज मांडण्यासाठी वकील मिळत नसल्याने कराड येथील विधीज्ञ हरिष प्रविणकुमार शहा यांनी विनोद कांबळे याची न्यायालयात बाजू मांडून त्याला जामीन मिळवून दिला होता.

जामीन मिळाल्यानंतर चोरट्याने अॅड. हरिष शहा यांना माझ्या वडिलांची किडनी फेल झाली आहे, ते शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे मला सातारला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमची गाडी मला द्या, मी उद्या तुम्हाला परत आणून देईन, अशी विनंती केली. परंतू गाडी चोराला गाडी कशी द्यायची हा विचार करून त्यांनी गाडी देण्यास नकार दिला. परंतू विनोदने जास्त गयावया केल्याने व रडून हंबरडा फोडल्याने अॅड. शहा यांना त्याची दया आली. करोनामुळे जिल्ह्यातील वाहतूक बंद आहे. त्यामुळे शहा यांनी त्यांच्या गाडीवरुन त्याला सातारला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते कराडहून सातारला निघाले. सुमारे दीड तासानंतर रात्री उशिरा सातारा येथील एमआयडीसी परिसरातील चंदननगर येथे पोहोचले.

येथे पोहोचताच चंदननगर येथील एका उंच इमारतीकडे बोट दाखवून हेच माझे घर आहे, असे विनोदने सांगितल्यानंतर अॅड. शहांनी गाडी थांबवली. शहा बेसावध असल्याचा फायदा घेत विनोदने शहांना मारहाण करीत त्यांची गाडी हिसकावून घेतली व घटनास्थळावरुन पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेने अॅड. शहा घाबरुन गेले. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस स्टेशन गाठत विनोद कांबळे विरोधात जबरदस्तीने गाडी चोरुन नेल्याची तक्रार दाखल केली. यानुसार सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 9:46 am

Web Title: in satara the lawyer who got bail a thief in the car theft case was beaten and the car was hijacked aau 85
Next Stories
1 सातारा : लग्न समारंभांना सशर्त परवानगी; मास्क वापरणे बंधनकारक
2 नगर शहरातील रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली
3 अकोल्यात ७६ टक्के रुग्णांची करोनावर मात
Just Now!
X