21 February 2020

News Flash

सोलापुरात सुप्रिया सुळेंच्या गाडीवर वाहतूक पोलिसांची कारवाई

खासदार सुप्रिया सुळे शनिवारी सोलापुरात 'संवाद यात्रा' घेऊन आल्या होत्या.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोलापूर भेटीत त्यांची मोटार रस्त्यावर ‘नो पार्किंग’मध्ये थांबविल्यामुळे वाहतूक पोलिसांनी दोनशे रूपयांची दंडात्मक कारवाई केली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. खासदार सुप्रिया सुळे शनिवारी सोलापुरात ‘संवाद यात्रा’ घेऊन आल्या होत्या. सायंकाळी इंदिरा गांधी डफरीन चौकातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूर शाखेच्या सभागृहात डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते आदी बुध्दिवंतांबरोबर संवाद साधण्यासाठी खासदार सुळे आल्या होत्या.

त्यावेळी सभागृहाबाहेर वर्दळीच्या रस्त्यावर अनेक वाहने थांबविण्यात आली होती. यात खासदार सुळे यांच्या (एमएच १२ आरटी ३८३७) मोटारीचाही समावेश होता. ‘नो पार्किंग’ मध्ये थांबविण्यात आलेल्या वाहनांमुळे तेथील सार्वजनिक रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे शहर वाहतूक पोलिसांना आढळून आले. तेव्हा वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सर्व थांबलेल्या गाड्यांची छायाचित्रे काढून सर्व संबंधित वाहनधारकांवर प्रत्येकी दोनशे रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यात खासदार सुळे यांच्या मोटारीवरही कारवाई झाली. ही कारवाई होताना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी व काही कार्यकर्त्यांनी त्यास विरोध दर्शविला. परंतु वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले.

First Published on August 24, 2019 10:32 pm

Web Title: in solapur action taken on ncp mp supriya sule car by traffic police dmp 82
Next Stories
1 एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
2 देशाने उत्तम संसदपटू गमावला, जेटलींच्या निधनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
3 आजारपणातही जेटली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचे – चंद्रकांत पाटील
Just Now!
X