आपण ज्वालामुखीवर बसलेलो आहोत. त्यामुळे भारतात बेकायदारित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांना इथून हाकलून दिलचं पाहिजे. त्यासाठी मी केंद्र सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आपण लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहोत असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात काही भाग असे आहेत. त्या भागांमध्ये अनेक बाहेरच्या देशांमधले मौलवी जातायत. काय करतायत माहित नाही. पोलिसही आत जाऊ शकत नाहीत. तिथे काय शिजतय हे कळत नाहीय. पण पोलिसांच्या माहितीनुसार प्रचंड काहीतरी मोठं घडवण्याचं कारस्थान रचलं जातयं. ही माहिती असेल तर पोलिसांना मोकळे हात देण्याची गरजेच आहे असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातले ते भाग कुठले आहेत त्याबद्दल राज ठाकरे यांनी माहिती दिलेली नाही. याबद्दल आपण लवकरच देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्याना भेटून त्याबद्दल माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरच्या देशातून आलेले मुस्लिम परत पाठवणं गरजेचं आहे. या देशात जे वातावरण मोर्चांनी उभं राहिलं. त्याला मोर्चाने उत्तर देणार, असे त्यांनी सांगितले. बांगलादेश, पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांना परत पाठवण्यासाठी ९ फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानावर महामोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर जाईन
मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? अशी चर्चा सुरु आहे.

मी पहिल्या सभेतच सांगितलय की, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत. आम्ही अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांना नाकारु शकत नाही असे राज म्हणाले.

जावेद अख्तरांबरोबर ऊर्दू भाषेवरुन झालेल्या चर्चेचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. ऊर्दू मुस्लिमांची भाषा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? ऊर्दू मुस्लिमांची भाषा नाही. बांगलादेश बंगाली भाषेसाठी स्वतंत्र झाला. ऊर्दूसाठी नाही. भाषा कुठल्याही एका धर्माची नसते तर ती त्या भागाची असते असे राज म्हणाले.