अनेक वष्रे मागणी लावून धरल्यानंतर अखेर बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवनाचे दरवाजे बळीराजाच्या निवासासाठी उघडले गेले. अन्य जिल्ह्य़ांमध्ये शेतकरी भवन सुरू होऊन ते शेतक-यांना अल्पदरात वापरावयास मिळत असले तरी येथील निवासाचे दर चढे असल्याबद्दल शेतक-यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. निवासाची सोय करून शेतक-यांना दिलासा दिला जात असताना बाजार समितीतील गूळ, भाजीपाला अशा कोणत्याही घटकांचे सौदे बंद पडणार नाहीत, याचीही दक्षता प्रशासकांनी घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतात उत्पादित झालेला माल घेऊन शेतकरी रात्री-अपरात्री बाजार समितीत येतो. अशावेळी शेतक-यांच्या निवासाची अडचण होते. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या अनेक ठिकाणी शेतकरी निवासाची उभारणी करण्यात आली. तथापि कोल्हापुरात हा प्रकल्प मागे पडला होता. बाजार समितीत असणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहाचे नूतनीकरण करून तेथे शेतकरी भवन आकाराला आले आहे. स्वतंत्र खोली, सामाईक कक्ष आणि केवळ आंघोळीसाठी वापर अशी सोय केली आहे. त्यासाठी अनुक्रमे ५०० रुपये, ५० रुपये व १० रुपये असा आकार आहे.
शेतकरी भवनाच्या उपयुक्ततेचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केले. मागे याचे दर अन्य जिल्ह्य़ापेक्षा जादा असल्याने ते सामान्य शेतकऱ्याला परवडेल असे ठेवावे. शेतक-यांच्या निवासाची काळजी वाहणाऱ्या प्रशासनाने शेतक-यांच्या अन्य बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. बाजार समितीच्या स्थापनेचा उद्देश शेतक-यांच्या मालाची विल्हेवाट योग्यवेळ, चांगल्या पद्धतीने होऊन लगेच पसेही (पट्टे) मिळणे हा आहे. तरीही बाजार समितीत अचानक सौदे बंद पाडून
शेतक-यांची आíथक पिळवणूक पद्धतशीरपणे करणारी यंत्रणा कार्यरत आहे. तिला कठोरपणे पायबंद घातला तर शेतक-यांचे कायमचे (राहते) निवास सुरू राहील, असे काटे म्हणाले.