News Flash

जलाशयांमध्ये ५६ टक्के साठा; चांगल्या पावसामुळे यंदा चिंता नाही!

यंदा मराठवाडय़ात पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असा विश्वास वर्तविला जातो.

मुंबई : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसाने यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, अशी चिन्हे आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्यात एकूण क्षमतेच्या ५६ टक्के  साठा शिल्लक असून, सहा जिल्ह्य़ांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. २७ जिल्ह्य़ांमध्ये पुरेसा साठा शिल्लक असल्याने यंदा पाण्याची तेवढी टंचाई जाणवणार नाही, अशी शक्यता वर्तवली जाते.

राज्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता. राज्यातील जलाशयांमध्ये चांगला साठा झाला होता. मार्च महिना संपत आल्याने जलसंपदा विभागाने पाण्याच्या साठय़ाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. या वेळी यंदा उन्हाळ्यात पाण्याची तेवढी समस्या जाणवणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून राज्याच्या अनेक जिल्ह्य़ांमध्ये टँकर्सला मागणी वाढते. यंदा अजून तरी टँकर्सची मागणी एप्रिलमध्ये येणार नाही, असा अंदाज बांधण्यात आला. अर्थात, टँकर्सच्या माध्यमातून फायदा होत असल्याने राजकीय नेते व कार्यकर्ते टँकरसाठी आग्रही असतात.

राज्यात आजच्या घडीला ६२.८१ टक्के  जलसाठा शिल्लक असला तरी त्यातील ५६.४७ टक्के  साठा हा उपयुक्त साठा म्हणून गणला जातो. गेल्या वर्षी याच काळात ३० टक्क्यांच्या आसपास जलाशयांमध्ये साठा होता. मराठवाडय़ात यंदा ५० टक्क्यांच्या आसपास साठा शिल्लक असला तरी गेल्या वर्षी याच काळात के वळ सहा टक्के  जलसाठा शिल्लक होता.

या पार्श्वभूमीवर यंदा मराठवाडय़ात पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असा विश्वास वर्तविला जातो. हिंगोली या एकमेव जिल्ह्य़ात एकू ण क्षमतेच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडय़ातील सर्व धरणांमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यातच साठा शून्य टक्के  किं वा राखीव साठय़ाचा वापर होत असे. यंदा मात्र धरणांमध्ये ५० टक्क्यांच्या आसपास पाण्याचा साठा आहे.

विभागीय पाण्याचा साठा

* अमरावती (४९.८६ टक्के ), औरंगाबाद (४९.११ टक्के), कोकण (६१.६९ टक्के), नागपूर (५५ टक्के ), नाशिक (५८.६९ टक्के ), पुणे (६०.३३ टक्के )

* ३० टक्क्यांपेक्षा कमी साठा असलेले जिल्हे – गडचिरोली, लातूर, जालना, उस्मानाबाद, परभणी, वाशीम

* ३१ ते ७५ टक्के  साठा असलेले जिल्हे – नगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ.

* ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असलेला जिल्हा – हिंगोली

मोठय़ा धरणांमधील पाण्याचा साठा

कोयना (६६.७९ टक्के ), दुधगंगा (६० टक्के ), नीरा देवधर (६८.८३ टक्के ), पानशेत (६८ टक्के ), खडकवासला (८२ टक्के ), तिल्लारी (४१.३३ टक्के ), उजनी (५८.२४ टक्के ), बारवी (८७.९७ टक्के ), पैठण (७२ टक्के ), भातसा (५९.७६ टक्के), गोसीखुर्द (२३ टक्के ), तानसा (५० टक्के ), मध्य वैतरणा (६७ टक्के )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 3:24 am

Web Title: in the second week of march maharashtra has water stock of 56 percent of total capacity zws 70
Next Stories
1 सागरी प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
2 कृषी प्रक्रिया संस्थांकडून सरकारचीच फसवणूक
3 पंकजा मुंडे यांच्या शिक्षक बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो
Just Now!
X