News Flash

इचलकरंजीत करोनाबाधित महिलेचा मृत्यू, एकूण रुग्ण संख्या ५३ वर

कोल्हापूर जिल्ह्यात करोनामुळे १४ वा बळी

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. इचलकरंजीत आज सकाळी एका ५८ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.  तीन दिवसापूर्वी उपचारार्थ ‘सीपीआर’मध्ये दाखल केलेल्या या महिलेचा आज पहाटे सहा वाजता मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाचा हा १४ वा बळी ठरला आहे.

याचबरोबर इचलकरंजीमधील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५३ वर पोहचली आहे. करोनाला प्रतिबंध करण्यासाठी शहरासाठी योग्य तो कडक निर्णय घ्यावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

दरम्यान, इचलकरंजी शहरातील एका लोकप्रतिनिधीच्या घरातील दोन सदस्यांना देखील करोाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.  यामुळे शहरात अधिकच खळबळ उडाली आहे.  शहरातील नागरिकांनी घरी राहावे सुरक्षित राहावे, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 10:59 am

Web Title: inchalkaranjit woman dies due to corona total number of patients is 53 msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “एमएसएमईच्या सुधारित मर्यादा लागू करण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना आदेश”
2 बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना करोनाची लागण
3 सह्य़ाद्री देवराईचा आषाढीवारीनिमित्त अनोखा उपक्रम
Just Now!
X