30 October 2020

News Flash

स्वातंत्र्य दिनी साताऱ्यात खळबळजनक घटना; पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा…

कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न

विश्वास पवार

७४ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. पण, साताऱ्यामध्ये स्वातंत्र्य दिनालाचा खळबळजनक घटना घडली आहे. एका कुटुंबानं न्याय मागण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी नलावडे कुटुंबियांची ४१ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत कुटुंबियांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. मात्र, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विशाल नलावडे, ज्योती नलावडे आणि राहुल नलावडे अशी नावे फसवणूक झालेल्या व्यक्तींची आहेत. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी व संचालकांनी ४१ लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप नलावडे कुटुंबिंयानी केला आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी या कुटुंबियांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज स्वातंत्र्यदिनी या नलावडे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी ज्योती नलावडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 1:26 pm

Web Title: incident in satara couple tried to burn nck 90
Next Stories
1 स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची सजावट
2 राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील करोनाबाधित
3 आत्मनिर्भर भारताचा ग्रामीण चेहरा, बीडच्या तरुणाने पत्र्याच्या शेडमध्ये बनवलं भारतीय बनावटीचं सॉफ्टवेअर
Just Now!
X