धुळे महापालिका निवडणूक – २०१८ मधील खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे तब्बल १६४ उमेदवारांना आगामी तीन वर्षांसाठी महापालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी ही कारवाई केली आहे.

अनर्हतेची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये धुळे शहरातील एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा व भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे. ६ फेब्रुवारी २०२० पासून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. या दिवशीच हा अध्यादेश जारी करण्यात आला होता. डिसेंबर २०१८ मध्ये धुळे महानगर पालिकेची निवडणूक पार पडली. ज्यामध्ये ३५६ उमेदवार निडवणुकीच्या रिंगणात होते.

निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुक निकाल लागल्यानंतर साधारण महिनाभाराच्या आत सादर करचा होता, मात्र १६७ उमेदवारांनी तो तपशील सादर केला नाही. विशेष म्हणजे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने नोटीस बजावून या सर्वांना खुलासा देखील सादर करण्यास सांगितले होते. मात्र, समाधानकारक खुलासा सादर केला न गेल्याने अखेर विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी या १६४ जणांवर अनर्हतेची कारवाई केली.